पार्टीकडून स्वारगेट आगारप्रमुखांकडे केली आहे. त्यासंबंधीचे निवदेन भाजपाचे तालुका अध्यक्ष
सुनील जागडे व सुशील भोसले यांनी दिले आहे.
वेल्हे तालु्क्यात दोन किल्ले आहेत किल्ले राजगड व किल्ले तोरणा या दोन्ही किल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी
होत असते. शनिवार, रविवार, तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी
परिसरातून पर्यटक येत असतात. किल्ले राजगडावर जाण्यासाठी स्वारगेट वरुन एसटी सेवा सुरू होती
परंतु कोरोनाने महाराष्ट्रातील एसटी सेवा पूर्णपणे बंद होती. लॅाकडाऊन उघडल्यानंतर एसटी सेवा पूर्ववत
करण्यात आलेली आहे.किल्ले राजगडावर पर्यटकांना जाण्यासाठी एसटी सेवा पुन्हा सुरू करणे आवश्यक
आहे. किल्ले राजगडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एसटी सेवा बंद असल्याने पर्यटकांची
तसेच या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संबधिचे निवदेन भारतीय
जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील जागडे,संयोजन व प्रज्ञा प्रशिक्षण व बुद्धीजीवि आघाडीचे सुशील भोसले,
सोशल मीडियाचे अध्यक्ष आकाश मांढरे हे उपस्थित होते.
स्वारगेट (पुणे ) गुंजवणे ते स्वारगेट एसटी सेवा सुरू करा, अशा मागणीचे निवेदन देताना सुशील भोसले.