शिरूर तालुक्यातील कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी गृहमंत्री शिरूर तालुक्यात आले होते. या वेळी टाकळी हाजी येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मागणीमुळे होत असलेल्या कोविड सेंटरची पाहणी नामदार वळसे-पाटील यांनी केली. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य अरुणा घोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे उपस्थित होते .
या वेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून जनतेने शासनाने दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पालन केले पाहिजे. प्रत्येकाने कुटुंबाची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी असलेल्या सर्व सोयी-सुविधांचा तसेच वैद्यकीय सेवेचा आढावा गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी घेतला.