प्रत्येकाला ४५ रुपयांमध्ये भोजन देण्यात येईल. जमा होणाऱ्या पैशातून गरीब आणि गरजू लोकांना मोफत भोजन देण्याची योजना आहे. आतापर्यंत चार हजार लोकांसाठी पैसे जमा झाले आहेत. दहा हजार लोकांना भोजन देण्याचे लक्ष्य आहे.
डिव्हाईन जैन ग्रुपचे सदस्य सर्वेक्षण करुन जिथे गरज आहे तिथे भोजन देतील.
या उपक्रमाचे उद्घाटन खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीहरी बहिरट यांच्या हस्ते झाले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना या वेळी भोजन दिले.
संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये परगावहून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक व रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबीयांना भोजन दिले. या वेळी रतन किराड, महेश शाह, राजन शाह, हार्दिक शाह, तेजपाल ओसवाल, जब्बर तांबोळी, प्रतीक मुळे, संकेत शाह उपस्थित होते.
तसेच सर्व लोकांना विनंती आहे की,आपल्या भागात
जर कोणाला भोजनाची गरज असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शाह यांनी केले आहे..