चंदननगर : नागरिकांचे प्रश्न ऐरणीवर असताना महापालिकेडून नागरिकांची मोहल्ला कमिटी बंद असल्यामुळे गैरसोय निर्माण झालेली आहे. महापालिकेने नागरिकांचे प्रश्न आरोग्य कचरा, रस्ता, विविध समस्यांचे निवारण होण्याकरिता मोहल्ला कमिटी हे व्यासपीठ सुरू केलेले आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नागरिकांच्या समस्या, तक्रारी, अडचणी मांडण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात येते. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित राहून सुचविलेल्या व केलेल्या तक्रारींची नोंदणी करून पुढील महिन्याच्या मोहल्ला कमिटीच्या आधी तक्रारींचे निवारण करून या बैठकीमध्ये संबंधित अहवाल दिला जातो. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांसाठी तयार केलेले हे व्यासपीठच बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाची मोहल्ला कमिटीची बैठक तातडीने सुरू करण्याची मागणी कर्तव्य जनमंचाचे अध्यक्ष प्रमोद देवकर यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
मोहल्ला कमिटी बैठक सुरू करावी
By admin | Published: April 26, 2017 4:03 AM