पीएमपीएलची बससेवा ‘हडपसर-पाटस-हडपसर’ या मार्गाने सुरू करण्यात यावी, कारण पाटस रेल्वे स्टेशन परिसरात दोन सिमेंट कारखाने आहेत. तसेच जवळच कुरकुंभची औद्योगिक वसाहत आहे. यामुळे दिवसेंदिवस वाढते नागरीकरण पाहता पाटसला मोठी वर्दळ वाढली आहे. तर येथील ग्रामस्थांना सातत्याने पुणे येथे कामानिमित्त ये-जा करावी लागते. परिणामी पाटसपर्यंत तातडीने पीएमपीएल सेवा सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनी चर्चा केली. पाटसच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचा नक्कीच विचार करून महानगर परिवहन महामंडळाकडून निर्णय घेण्यात येईल, अशी खात्री अधिकाऱ्यांनी दिली. या वेळी जुनेद तांबोळी, गणेश जाधव, स्वप्निल सोनवणे, राजू गोसावी, हर्षद बंदिष्टी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या वाहतूक व्यवस्थापक यांना निवेदन देताना पाटसचे ग्रामस्थ.