उरुळी कांचन : उरुळी कांचन रेल्वे स्थानकावरील व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या छेडछाडीच्या घटना लक्षात घेता. या स्थानका शेजारी पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागनी राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बडेकर यांनी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उरुळी कांचन रेल्वे स्थानक आवारात गुन्हेगारींचा घटनांबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अपु-या मनुष्यबळाअभावी पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. यामुळे या ठिकाणी नवे पोलिस मदत केंद्र उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या स्थानकाजवळ महात्मा गांधी विद्यालय आहे. येथे शिक्षणासाठी येणा-या मुलींची संख्या मोठी आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर त्यांच्या छेडछाड करण्याच्या घटना वाढल्या आहे. शिवाय या परिसरात टवाळखोरांचाही उच्छाद झाला आहे यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस मदत केंद्राची मागणी पुढे आली आहे. बडेकरनगर परिसरात पोलिस मदत केंद्रासाठी भिमरत्न बाळासाहेब बडेकर भवनात आर.सी.सी. बांधकामात जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली असल्याने लवकरच पोलिस मदत केंद्राचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस आधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे मंजुरीस पाठवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.