शिरुर येथे सी. टी. बोरा कॉलेजमध्ये असलेले कोविड सेंटर पूर्ण भरले आहे. कालपासून पेशंटला कारेगाव किंवा कोंढापुरीत जायला सांगत आहे. यामुळेे कोरोनाबाधित रुग्णांची व त्याचे नातेवाईकांची मोठे हाल होत असून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शिरूर शहर, शिरूर ग्रामीण, तर्डोबाचीवाडी या दोन्ही भागांत रोज 75 ते 100 कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे.
त्यामुळे सी. टी. बोरा कॉलेजचे मुलांचे, गोलेगाव रोडवरील शासकीय मुलींचे वस्तीगृह, नगर परिषद नवीन इमारत,नगरपालिका मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तिथे कोविड केअर सेंटर सुुरू करावेे. बोरा कॉलेज येथे 50 बेड तयार होऊ शकतात. तसेच नगर पालिका मंगल कार्यालयात 100 बेडचे कोविड सेंटर तयार होऊ शकते. नवीन नगरपालिका इमारत 150 बेडचे कोविड केअर सेंटर तसेच शासकीय मुलींच्या वसतिगृहात 100 बेड असे एकूण ठरवले तर 400 बेड उपलब्ध होऊ शकतात. तसेच शिरूर शहराजवळ असणारे मंगल कार्यालय ही पर्याय कोविड केअर सेंटरसाठी होऊ शकते. यासाठी प्रशासनाने लक्ष घालून ही सेंटर सुरू करावी. शिरूर शहरात कोविड केअर सुरू करण्यासाठी पारनेर तालुक्यात प्रमाणे शिरूर तालुक्यातील नागरिकांनीही पुढाकार घेऊन शिरूर मधील कोरोनाबाधित नागरिकांच्या सोयीसाठी कोविड केअर सुरू करून दानशूर लोकांनी त्यासाठी मदत करावी.
शिरूर शहरात वाढती कोरोनाबाधित संख्या चिंताजनक असून या रुग्णांना कोविड केअर सेंटर उपलब्ध होण्याकरिता शहरातील मंगल कार्यालय, शाळा, कॉलेज वसतिगृह या ठिकाणी ती सुरू करावीत.
ॲड. रवींद्र खांडरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी लिगल सेल
शिरूर शहर व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, या ठिकाणी एकच कोविड केअर सेंटर सुरू असून तेही भरले झाले आहे. त्यामुळे शहरात आणखी एक सेंटर शासनाने सुरू करावे. रुग्णांचे नातेवाईक रुग्ण यांना होणारा मानसिक आर्थिक त्रास यामुळे कमी होईल.
कैलास भोसले, शिवसेना जिल्हा संघटक.
शहरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून, कोरोनाबाधित रुग्णांकरिता असणारे एकच covid-19 केअर सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहे व रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील आणखी शाळा ,कॉलेज, यांचे होस्टेल तसेच बाजूची मंगल कार्यालय शासनाने अधिग्रहित करून त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करावीत. यामुळे येथील रुग्णांना सोयीस्कर होणार आहे.
मेहबूब सय्यद जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना