आंबेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणा-या परवानगीसाठी एक खिडकी कक्ष तीन ठिकाणी तहसील कार्यालयात सुरू केली आहे.
गावडेवाडी, शिरदाळे, जवळे, काठापुर बु., खडकी, रानमळा, लांडेवाडी-पिंगळवाडी, काळेवाडी-कोटमदरा व महाळुंगे पडवळ या ग्रामपंचायतींसाठी ए. बाळसराफ, रोहन डावरे यांची एक खिडकी कक्षाकरिता नियुक्ती केली आहे.
गिरवली, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, पिंपळगावतर्फे म्हाळुंगे, अवसरी खुर्द व मंचर यासाठी कृषी अधिकारी पाटोळे व योगेश सोनवणे यांची नियुक्ती तर शेवाळवाडी, एकलहरे, पेठ, थुगांव, लौकी, शिंगवे, भागडी, खडकी व वळती या ग्रामंपचायतींसाठी एस. एस. वांगसकर, सुनील रोकडे यांची एक खिडकी कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.