आत्मविश्वास न गमवता पुन्हा एकदा संसार उभा करा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 04:19 PM2018-12-22T16:19:26+5:302018-12-22T16:24:18+5:30

राष्ट्रवादी संलग्न शिवराय पथारी संघटनेच्या वतीने शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्त अशा सुमारे 306 कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

start your life again with confidence : ajit pawar | आत्मविश्वास न गमवता पुन्हा एकदा संसार उभा करा : अजित पवार

आत्मविश्वास न गमवता पुन्हा एकदा संसार उभा करा : अजित पवार

Next

पुणे : पाटील इस्टेट येथे 28 नाेव्हेंबर राेजी लागलेल्या आगीत येथील शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. पंधरा - वीस दिवसानंतर येथील रहिवाशांनी स्वतःच आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी संलग्न शिवराय पथारी संघटनेच्या वतीने शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्त अशा सुमारे 306 कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पाटील इस्टेट झाेपडपट्टी जळीतग्रस्तांनी स्वतःला एकटे न समजता, आत्मविश्वास न गमवता पुन्हा एकदा संसार उभे केले पाहिजेत त्यांच्या या प्रयत्नात राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीने त्यांच्याबराेबर आहे असा विश्वास अजित पवार यांनी येथील रहिवासियांना दिला. 

    पवार पुढे म्हणाले, केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेत विरोधी विचारधारेचे सरकार सध्या आस्तित्वात आहे. हे सुटा-बुटातील सरकार असून त्यांना गरीबांच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षाची काही घेणे नाही. लोकांचे जगण्याचे प्रश्न जटील होत असतांना यांना स्मार्ट सिटी सारखी उठाठेव करावशी वाटते. यावरुनच हे सरकार समाजातील नक्की कोणत्या समाजाला प्राधान्य देते हे अधोरेखीत होते. झोपू अंतर्गत तुम्हांला घरे मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पाठपुरावा करेल आणि गरज पडलीतर त्याला तीव्र आंदोलनाचे स्वरुप देखिल देऊ. या वस्तित राहणारा कचरा वेचक, रिक्षा चालक, भाजी विक्रेता हा देखील समाजाचाच एक भाग आहे आणि सर्वांच्या विकासाेबत याही वर्गाचा विकास होण आवश्यक आहे,त्याशिवाय सर्वांगिण विकास झाला असे म्हणता येणार ऩाही. राजकीय इच्छा शक्ती दाखवत या सरकारने या झोप़पट्टीबाबत त्वरीत पाऊले उचलावीत अन्यथा राष्ट्रवादी आंदोलन छेडेल असा ईशारा देखील पवार यांनी यावेळी दिला. 

Web Title: start your life again with confidence : ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.