संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून बारामती परिसरात एक लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. केपजेमिनी व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यू या संस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. बारामती तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तसेच बारामती नगरपालिकेचे जुने गावठाण व वाढीव हद्दीसह, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही या झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. या वृक्षारोपणादरम्यान पिंपळ, करंज, वड, काशिद, अर्जुन, ताम्हण, कांचन, शिसम, सीताफळ, जांभूळ, चिंच, आंबा आदी झाडे लावली जातील. तालुकास्तरावर याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सायंबाचीवाडी गावात वृक्षारोपण करून करण्यात आले. या उपक्रमाबाबत एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे दिलीपराव जगताप यांनी आभार मानले. यावेळी एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडियाची संपूर्ण टीम तसेच सरपंच हनुमंत भगत, उपसरपंच प्रमोद जगताप, दुर्योधन भापकर, घाडगे भाऊसाहेब, नारायण भापकर, गणेश भापकर आणि सायंबाचीवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सायंबाचीवाडी येथे एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने १ लाख वृक्षलागवड सुरुवात करण्यात आली.
१९०७२०२१-बारामती-०१