शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘थर्ड पार्टी कंपनी’बरोबर करारास पुणे पालिकेची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 12:36 PM

महापालिकेच्या सभागृहात तक्रार करण्यात आलेल्या काही कंपन्या यात पुन्हा उतरल्या असल्याची माहिती

ठळक मुद्देविकासकामांची तपासणी : तक्रार असलेल्या कंपन्यांचाही समावेशकंपन्यांना कामाच्या एकूण खर्चाच्या २ टक्के रक्कम पालिकेकडून मानधन काही तफावत आढळली तर त्या कंपनीला त्वरित काळ्या यादीत टाकले जाईल.

पुणे : पालिकेच्या विकासकामांची तटस्थ यंत्रणेकडून (थर्ड पार्टी इन्स्पेक्श्न) तपासणी करण्यासाठी अशा कंपन्यांबरोबर करार करण्यास क्षेत्रीय कार्यालयांनी सुरुवात केली आहे. ढोले-पाटील रस्ता तसेच सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने असा करार केला आहे. सर्वसाधारण सभेत तक्रार झालेल्या काही कंपन्यांनाही यात सामावून घेतले जात असल्याची चर्चा आहे.रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पदपथांची दुरुस्ती, गटारे, नाली, विरंगुळा केंद्र अशा कामांमध्ये दर्जा ठेवला जावा, यासाठी पालिकेकडून अशा कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केले जाते. काम योग्य असल्याचे अशा कंपनीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय ठेकेदार कंपनीला बिल दिले जात नाही. त्यासाठी या कंपन्यांना कामाच्या एकूण खर्चाच्या २ टक्के रक्कम पालिकेकडून मानधन दिले जाते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना अशा कंपन्या नियुक्त करून दिल्या जातात व त्यांच्याकडून कामाची तपासणी करून घ्यावी, असे सांगितले जाते.या कंपन्यांच्या कामांबाबत तक्रारी आल्याने मागील दोन वर्षे ही तपासणीची पद्धत बंद करण्यात आली होती.  त्यामुळे आता क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याबरोबर कनेक्ट असलेल्या जुन्याच कंपन्यांबरोबर लगेचच करार करण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या सभागृहात तक्रार करण्यात आलेल्या काही कंपन्या यात पुन्हा उतरल्या असल्याची माहिती मिळाली. नगरसेवक अविनाश बागवे यांनी एका कंपनीबाबत थेट सभागृहातच पुराव्यानिशी आरोप केले होते. एका अधिकाऱ्याच्या निकटच्या नातेवाईकाचीच ही कंपनी असून त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात व संबंधित कामात तफावत असल्याचे सभागृहात उघड झाले होते. त्यावरून त्या कंपनीची चौकशीही करण्यात आली होती. आता पुन्हा तीच कंपनी या स्पर्धेत असून त्यांना काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते.......पद्धतच चुकीची जे काम पालिकेच्या अभियंत्यांनी करणे अपेक्षित आहे त्या कामासाठी २ टक्के मानधन देऊन स्वतंत्र कंपनी नियुक्त करणेच चुकीचे आहे. या कंपन्या नियुक्त करण्याचे निकष, त्यांची कार्यक्षमता, त्यांच्याकडे तज्ज्ञ आहे की नाही, तपासणी खरोखरच केली जाते की नाही, याबाबत सगळेच अनभिज्ञ असतात. - अविनाश बागवे, नगरसेवक, काँग्रेस.............स्वतंत्र पथक स्थापणारही पद्धत पुन्हा सुरू करण्याबाबत पालिकेच्या दक्षता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, की आयुक्तांनी कंपन्यांना कामाची चौकट तर ठरवून दिली आहे. शिवाय आयुक्तस्तरावर एक स्वतंत्र पथक यासाठी स्थापन करण्यात येत आहे. त्यात पालिकेतील तज्ज्ञ अधिकारी असतील. हे पथक त्या कंपन्यांनी दिलेल्या एखाद्या कामाचे प्रमाणपत्र व ते काम याची अचानक तपासणी करतील. त्यात काही तफावत आढळली तर त्या कंपनीला त्वरित काळ्या यादीत टाकले जाईल. हे पथक लवकरच कार्यरत होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका