शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

माळशेज घाटात दुरुस्तीचे काम सुरू

By admin | Published: April 27, 2017 4:42 AM

माळशेज घाटात सध्या धोकादायक दरडींना जाळ्या लावण्याचे, संरक्षक भिंतींचे आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरू आहे

खोडद : माळशेज घाटात सध्या धोकादायक दरडींना जाळ्या लावण्याचे, संरक्षक भिंतींचे आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरू आहे, माळशेज घाटातील वाहतूक कधीपासून बंद ठेवायची, याबाबत निश्चित नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी सांगितले.माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी २०१६ मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात ४ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर आॅगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.सन २०१६ पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. सध्या माळशेज घाटात धबधब्यांचे पाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडते तसेच ज्या ज्या ठिकाणी रस्ता वारंवार उखडला जातो अशा ठिकाणी काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.घाटात काँक्रिटीकरणाचा १७० मीटर लांबीचा रस्ता ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. घाटाच्या एका बाजूला असणाऱ्या खोल दरीमुळे अपघात होऊ नयेत, अशा धोकादायक ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या संरक्षक भिंती बांधण्यात येत आहेत. घाटात दुरुस्ती व संरक्षणात्मक काम करण्यासाठी २ क्रेन, ३ पोकलँड, २ जेसीबी, ४ ट्रॅक्टर, २ रोलर आदी यंत्रसामग्री कार्यरत आहे.