पुणे : शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम सध्या १६० केंद्रांवर चालू असून, महापालिकेकडे आणखी दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून गुरूवारी देण्यात आली़ दरम्यान, को-व्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला आजपासून सुरूवात झाली असून, २८ दिवसांनी देण्यात येणाऱ्या या दुसऱ्या डोसकरिता ३५ हजार डोस महापालिकेकडे उपलब्ध आहेत़
सद्यस्थितीला को-व्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचे मिळून महापालिकेकडे साधारणत: ६७ हजार ४० डोस आहेत़ यापैकी पन्नास हजारांहून अधिक डोस हे संबंधित लसीकरण केंद्रांवर पोहोचले असून, कोविशिल्डचे १३ हजार ७८० डोस महापालिकेच्या नारायण पेठ येथील शीतगृहात शिल्लक आहेत़
शहरातील १६० लसीकरण केंद्रांपैकी ९३ केंद्रे हे सरकारी आहेत, तर ६७ केंद्रे ही खाजगी रूग्णालयांमध्ये आहेत़ यापैकी काही केंद्रांवर दोन बूथ चालू आहेत़
को-व्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस महापालिकेच्या १५ तर खाजगी रूग्णालयांमधील १९ केंद्रांवर देण्यात येणार आहे़ यात महापालिकेच्या केंद्रांमध्ये १) राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा , २) गलांडे पाटील दवाखाना, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, ३) नायडू हॉस्पिटल ४) औंध कुटी रुग्णालय, ५) जयाबाई सुतार रुग्णालय, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, ६) शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, ७) श्री शरद पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, ८) मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल सिंहगड रोड , ९) थरकुडे दवाखाना, वारजे , १०) भानगिरे हॉस्पिटल, महंमदवाडी, ११) सावित्रीबाई फुले ओ. पी.डी. कोंढवा, १२) शिवरकर हॉस्पिटल, वानवडी, १३) कमला नेहरू हॉस्पिटल, कसबा , १४) मालती काची हॉस्पिटल, भवानी पेठ व १५) आंबेडकर दवाखाना, बिबवेवाडी यांचा समावेश आहे़
याचबरोबर पुढील खाजगी लसीकरण केंद्रांमध्येही को-व्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे़ यामध्ये १) संजीवन हॉस्पिटल, २) भारती हॉस्पिटल, ३) नोबेल हॉस्पिटल, ४) गॅलक्सी केअर, ५) रुबी हॉल क्लिनिक, पुणे स्टेशन, ६) देवयानी हॉस्पिटल, ७) औंध इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, ८) के.ई.एम. हॉस्पिटल, रास्ता पेठ, ९) साने गुरुजी रुग्णालय, हडपसर, १०) इनामदार हॉस्पिटल, वानवडी, ११) साई श्री हॉस्पिटल, औंध, १२) शाश्वत हॉस्पिटल, औंध, १३) ग्लोबल हॉस्पिटल, १४) ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, १५) जोशी हॉस्पिटल, १६) पुना हॉस्पिटल, १७) रांका हॉस्पिटल, १८) सह्याद्री हॉस्पिटल, नगर रोड १९) दीनदयाल हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रांचा समावेश आहे़
------------------------------------