गेली दोन वर्षांच्या जवळपास हे कार्यालय दौंड येथे सुरू होते. परिणामी ग्रामस्थांची गैरसोय होत होती. तलाठीही भेटायचे निश्चित नसायचे दौंड-पाटस रोडवर एका कॉम्ल्पेक्समध्ये अडगळीत तलाठी कार्यालय सुरू होते. या कार्यालयाला कुठेही फलक नव्हता तर ३३ पायऱ्या चढून ग्रामस्थांना कार्यालयात जावे लागत होते. नवीन गार येथून कोणाच्या परवानगीने दौंड येथे तलाठी कार्यालय स्थलांतरीत केले याची तहसील प्रशासकिय पातळीवर आद्याप नोंद नसल्याचे समजते. दरम्यान, नवीन गारमध्ये विद्युत पुरवठा नसतो, संगणकासाठी रेंज नसते.
असे कारण सांगून नवीन गार येथील कार्यालय दौंड येथे सोयीनुसार हलविण्यात आले असल्याचे बोलले जाते . माञ वस्तुस्थिती तशी नाही गावात रेंजसाठी मोठा टॉवर आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाला तर तरी दुसरी व्यवस्था करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे आता नवीन गार येथे सुरु झालेले हे कार्यालय पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी कोणतेही कारण सांगून घेऊन जाऊ नये अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.