शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

पुणे व बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवार पासून सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 4:24 PM

दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना गुरूवारपासून येत्या 4 एप्रिलपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.

ठळक मुद्देपुणे व बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिस-या टप्प्यात होणार झेरॉक्स किंवा फॅक्स वरून मागवलेला एबी फॉर्म स्वीकारला नाही जाणार खुल्या संवर्गातील उमेदवाराला २५ हजार आणि राखीव उमेदवारास १२.५०० रुपये अनामत रक्कम पुणे,बारामती मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ 

पुणे: लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून येत्या गुरूवारी (दि.२८) पुणेबारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना गुरूवारपासून येत्या 4 एप्रिलपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारसह केवळ पाच व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात प्रवेश मिळेल,असे अप्पर जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे.त्यात पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिस-या टप्प्यात होणार आहे.तसेच या मतदार संघांची निवडणूकीची अधिसूचना जाहीर होणार आहे.त्यामुळे गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे पुण्याचे उमेदवार तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बारामतीचे उमेदवार अतिरिक्त आयुक्त सुभाष भांबरे यांचाकडे अर्ज सादर करू शकतील.काळे म्हणाले, गुरूवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. मात्र, उमेदवाराला स्वत: बरोबर केवळ चार व्यक्तींना निवडणूक कार्यालयात घेवून जाता येईल. तसेच केवळ तीन वाहने कार्यालयाच्या आवारात घेवून जाता येतील. निवडणूक खर्चाचा तपशील पाहण्यासाठी उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते खोलणे आवश्यक असून अर्जाबरोबर खाते क्रमांक सादर करावा लागेल. उमेदवाराने अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आत स्वत: शाईने स्वाक्षरी केलेली मुळ एबी फॉर्म जमा करावा.झेरॉक्स किंवा फॅक्स वरून मागवलेला एबी फॉर्म स्वीकारला जाणार नाही.तसेच खुल्या संवर्गातील उमेदवाराला २५ हजार रुपये आणि राखीव संवगार्तील उमेदवारास १२.५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.निवडणूक आयोगाच्या नवीन नियमावलीनुसार फॉर्म 26 चा सुधारित नमुदा सादर करावा लागेल.त्यात गेल्या पाच वर्षाचे पूर्ण कुटुंबाचे प्राप्तीकर भरल्याचे प्रमाणपत्र आणि परदेशातील संपत्तीची माहिती द्यावी लागेल,असे नमूद करून काळे म्हणाले,सर्वोच्च न्यायालयाच्या १० ऑक्टोबर २०१८ च्या आदेशानुसार प्रत्येक उमेदवाराला स्वत:वरील गुन्हेगारी प्रकरणाचा तपशील द्यावा लागेल.तसेच संबंधित तपशील वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून मतदानादरम्यान तीन वेळा प्रसिध्द करणे बंधनकारक राहिल. उमेदवाराने अलिकडच्या तीन महिन्यांच्या कालावधीत काढलेले रंगीत किंवा कृष्णधवल 5 छायाचित्र देणे द्यावे आवश्यक आहे. टोपी किंवा काळ्या रंगाचा गॉगल असलेले छायाचित्र स्वीकारले जाणार नाही.कार्यालयात सादर केलेले हेच छायाचित्रच ईव्हीएम मशीनवर प्रसिध्द केले जाईल, असेही काळे यांनी स्पष्ट केले.........पुणे,बारामती मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ उमेदवाराला निवडणूक काळात होणा-या खर्चाचा तपशील दररोज सादर करावा लागेल.निवडणूकीस उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराची सर्व प्रकारची माहिती कार्यालयाच्या बाहेर तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.त्यात गुन्हेगारी स्वरूपाची माहिती व आर्थिक संपत्तीच्या माहितीचाही तपशील असेल,असेही काळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBaramatiबारामती