पुणे - सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणीत सहकार पॅनलचा धुव्वा उडवित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून पुन्हा एकदा सहकारावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ निवडणुकीची सर्व सूत्रे मुंबईतून हलविण्यात येत होती़निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ संघाची ६ मार्च रोजी २१ जागांपैकी १० जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे १० उमेदवार निवडून आले, तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार माधवराव सोनवणे हे राज्यस्तरीय मतदारसंघातून याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर इतर ४ उमेदवार विभागीय मतदारसंघातून निवडून आल्यानंतर, त्यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबादिला आहे.या निवडणुकीत एकूण २२०० मतदारांपैकी १ हजार ८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलला प्रत्येक मतदारसंघात संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी धोबीपछाड दिला. राज्यातील सुमारे ७ लाख कुटुंबीयांशी ही संस्थासंबंधित आहे.नाशिक विभाग सहकारी संघ१) पांडुरंगकाका सोले-पाटील (नाशिक विभाग सहकारी संघ)ड्रॉ मधील विजयी उमेदवारकोकण विभाग सहकारी संघातील एका जागेसाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये बरोबरी झाली.त्यामुळे चिठ्ठीद्वारे ड्रॉ काढण्यातआला. त्यात भाऊसाहेब कुºहाडे विजयी ठरले.हल्याळकर निंगोडा मल्लप्पा(विभागीय सहकारी संघ)मगर गुलाबराव आप्पाराव(औरंगाबाद विभागीयसहकारी संघ)परिवर्तन पँनल(इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघ)विजयी उमेदवाराचे नाव मिळालेली मते१) संजीव राजाराम कुसाळकर १११५२) चंद्रकांत गणपतराव जाधव १०७५३) सुनील श्यामराव ताटे १०४४४) मुकुल श्यामराव पोवार १०४३५) विलास सुधाकर महाजन ९८९सहकार पॅनल (इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघ)पराभूत उमेदवार मिळालेली मते१) बनकर नितीन धोंडिराम ८३३२) म्हस्के गोपाळ रामचंद्र ५३५३) लायगुडे अनंत खंडू ५१६४) लोणारे प्रकाश मारोतराव ४९१५) सावंत यशवंत राजाराम ५०५परिवर्तन पॅनल(विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ)उमेदवाराचे नाव मिळालेली मतेमोरे रामदास शंकर ११६८(विजयी)सहकार पॅनल( विमुक्त जाती-भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ)१) वाघ सुनील सुरेश ७८९ (पराभूत)परिवर्तन पॅनल(इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ)उमेदवाराचे नाव मिळालेली मते१) बोरूडे अर्जुन मल्हारी ११४५ (विजयी)सहकार पॅनल(इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ)उमेदवाराचे नाव मिळालेली मतेसोले-पाटील पांडुरंगकाका गोपाळराव ३३२ (पराभूत)परिवर्तन पॅनल ( महिला-मतदारसंघ)उमेदवाराचे नाव मिळालेली मतेपाटील विद्याताई शशिकांत ११३४ (विजयी)माळी सुनीता विलासराव १०७३ (विजयी)सहकार पॅनल (महिला-मतदारसंघ)उमेदवाराचे नाव मिळालेली मतेमोराळा सुशीला गणपतराव ७४८ (पराभूत)वाहेगावकर मंगलबाई अनंतराव ६९८ (पराभूत)परिवर्तन पॅनल(अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ)उमेदवाराचे नाव मिळालेली मतेपथाडे सिद्धार्थ आस्तिक ११३५ (विजयी)सहकार पॅनल(अनुसूचित जाती - जमाती मतदारसंघ)भांडे बाळासाहेब सीताराम ६९१(पराभूत)बिनविरोध निवडून आलेले उमेदवार१) हिरामण सातकर (पुणे विभाग सहकारी संघ)२) प्रतापराव पाटील (कोल्हापूर विभागसहकारी संघ)३) भिकाजी पारले( मुंबई विभाग सहकारी संघ)४) रामकृष्ण बांगर (लातूर विभाग सहकारी संघ)५) सुहासराव तिडके (अमरावती विभागसहकारी संघ)६) माधवराव सोनवणे (राज्यस्तरीयसंघीय संस्था)७) सुभाष आकरे(नागपूर विभाग सहकारी संघ)
राज्य सहकारी संघावर आघाडीची मोहोर, भाजपा पुरस्कृत पॅनलचा २०-१ ने धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:45 AM