शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:49 PM2020-01-27T17:49:33+5:302020-01-27T17:54:56+5:30

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू

State Government committed for the upliftment of farmers, laborers and the neglected: Ajit Pawar | शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल : अजित पवार 

शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल : अजित पवार 

Next
ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवार वाड्यावर ध्वजारोहण्

पुणे : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
    प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी विविध पथकांची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त व विशेष सुरक्षा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
    यावेळी राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, पुणे पोलीस आयुक्त कार्यालय पथक, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला पोलीस दल, रेल्वे पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी संचलन केले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, वन विभाग, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग यांनी माहितीपर चित्ररथ सादर केले. यावेळी पोलीस वाद्यवृंद, वाहतूक पोलीस मोटर सायकल रायडर पथक, श्वान जॅक गुन्हे शोधक यांनी सलामी दिली.
------------------------
डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
----------------
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवार वाड्यावर ध्वजारोहण्
 परंपरेनुसार शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, अमृत नाटेकर, भारत वाघमारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उप विभागीय अधिकारी संतोष देशमुख आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
--------------
सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नवीन मध्यवर्ती इमारत परिसरात सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


 

Web Title: State Government committed for the upliftment of farmers, laborers and the neglected: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.