शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 6:06 PM

राज्य सरकारने बार, दारु मालकांचे धंदे सुरु करताना अशा बैठका घेतल्या होत्या का ?

बारामती: राज्य शासन वारकऱ्यांच्या बैठका घेत त्यांना झुलवत ठेवत आहे. बार, दारु मालकांचे धंदे सुरु करताना सरकारने अशा बैठका घेतल्या होत्या का ? हे वसुली सरकार महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी व हिंदू सण-समारंभावेळीच कोरोनाचे निमित्त काढते आहे. औरंगजेबाच्या काळात संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिले होते. मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव घेवून हे सरकार औरंगजेबासारखे काम का करतेय ? बहुजनांच्या भावनांच्या विरोधात जात सरकारने पायी सोहळ्याला परवानगी नाकारली. परंतू, ३ जुलैपासून काही वारकरी आळंदीपासून पायी वारीला निघणार आहेत.  एक दिवस या पायी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी(दि १९) बारामती तालुक्यात विविध समाजातील प्रतिनिधींबरोबर घोंगडी बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली. पडळकर म्हणाले,राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे काही गोष्टी राजकारणात घडल्या.राज्य सरकारकडूनच सामाजिक सलोखा बिघडेल असं वर्तन सुरु आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्या माध्यमातुन विविध मंत्र्यांच्या प्रतिक्रियांमधून होत आहे.मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य शासन गंभीर नाही.ओबीसी राज़किय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.त्या ओबीसी ३४६ जातींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे पडळकर म्हणाले.

धनगर आरक्षणच्या बाबतीत १०० टक्के विरोधात राज्य सरकार आहे.तत्कालीन सरकारने आदीवासींच्या २२ योजना धनगर समाजाला लागु केल्या होत्या.विविध सवलती या माध्यमातुन समाजाला जाहिर केल्या होत्या.महाविकास आघाडी सरकारने १००० कोटी मागील धरलेले नाहित.तर या वर्षीचे १००० हजार कोटी दिलेले नाहित.समाजाचे एकुण २ हजार कोटीचे नुकसान दिलेले नाही. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे पहिल्यापासून काम करत आहेत. ते भाजपचे म्हणून नव्हे तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचेही पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना थेट आव्हान.... अजित पवार यांना मी आव्हान देतो की, बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला. निवडणुकीआधी अवघ्या १५ दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले. पवार यांनी निवडणुकीच्या आधी १५ दिवस आधी फॉर्म भरून अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर आटपाडीमधून स्थानिक नेत्यांचा पाठिंबा न घेता लढवावी. तर माझ्यासारखीच अवस्था त्यांची होईल.माझा पराभव त्याचवेळी मी मान्य केला आहे. त्याच विषयांवर पवार यांनी बोलु नये. ते तणावात असल्यासारखे वाटतात. मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण याविषयावर त्यांनी बोलावे असेही पडळकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारणPandharpur Wariपंढरपूर वारी