पुणे, दि. 18 : राज्यातील शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज आशा पुरोगामी विचारवंत, समाजसुधारकांचे विचार डावलून राज्य सरकार मात्र बोंदू बुवा-बाबांच्या चरणी लीन झाले आहे, अशी प्रखर टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली. जिल्ह्यातील २८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तर १३७ विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्कार तसेच ४ शाळांना अध्यक्ष चषक अजित पवार यांच्या हस्ते बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात प्रदान करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, केंद्र तसेच राज्य सरकारमधील काही मंत्री आणि आजी-माजी नेते पेट्रोल दरवाढीबद्दल बेताल वक्तव्य करत आहे. कर्जमाफीमुळे अनेक शेतकºयांना लाभ होणार आहे. त्यासाठी शासनाने लाभार्थी शेतक-यांना कर्जमाफी देताना अटी तपासूनच कर्जमाफी द्यावी. शासनाने राज्यातील अनेक शहरे स्मार्ट म्हणून घोषित केली आहेत. परंतु, पुण्यासारख्या शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू रोगाने थैमान घातले आहे. अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर काही रुग्ण मृत्यूच्या दारात आहेत. परंतु, शासन आणि प्रशासनाच्या याकडे लक्ष नाही. त्यामुळे सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन सुधारणा केली पाहिजे. त्यासाठी स्वाईन फ्लू आणि डेंग्यूसारख्या रोगांंवर नियत्रंण आणले पाहिजे. आॅक्सीजनअभावी नाशिक शहरात बालकांचा मृत्यू झाले, यासारखे दुर्दैव नाही. सरकारने केवळ पैसा उपलब्ध करून न दिल्याने आॅक्सीजनअभावी बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती या खात्याच्या मंत्र्याने दिली आहे.
बुवाबाजी आणि दोरा-गंड्याने अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेपासून शिक्षकांनी दूर राहिणे आवश्यक आहे. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी आज पुरस्कार मिळालेल्या आदर्श शिक्षक तसेच सर्वच शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. देशात भोंदूबाबा रामरहिम याच्या कृत्यामुळे अंधश्रद्धेचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे शिक्षकांनी अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकावी. बुवाबाजीला थारा देऊ नका. त्यापेक्षा आई-वडील आणि संस्कारक्षम विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवा, असे आवाहन अजित पवार यांनी शिक्षकांना केले.मंत्री, सचिवांच्या मुलांना सहज शिष्यवृत्ती मिळते...शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना डावलले जात आहे. मागास वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करायला सरकारकडे पैसा नाही. मात्र राज्यातील मंत्री, सचिवांच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी सहज शिष्यवृत्ती मिळते, हे या राज्याचं मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. महिलांवरील अत्याचाºयांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. तसेच आश्रम शाळांतील मुलींचे लैगिंक शोषण केले जात आहे.फुटबॉल खेळाचा कहर केलादोन दिवसांपूर्वी कोणतेही नियोजन नसताना फुटबॉल खेळायला सुरुवात केली. खेळाला विरोध नाही पण, कोणत्याही खेळामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. शासनाने ठरविले असल्यामुळे संबंधिताांना हा कार्यक्रम राबविताना तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी फुटबॉल खेळताना चेंडू कोठून आणायचा, मैदान उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे सगळीकडे सावळा गोंधळ सुरु असून, फुटबॉल खेळाचा तर शासनाने कहरच केल्याचा आरोप या वेळी अजित पवार यांनी केला.घरातला घरात राग बाहेर काढू नकापिंपरी-चिंचवड येथील एका शिक्षिकेने काही दिवसांपूर्वी लहान विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. एखाद्याने अभ्यास, गृहपाठ नसेल केला तर जरूर शिक्षा करावी. मात्र संबंधित विद्यार्थ्याला निर्दयीपणे शिक्षा करू नका. काही शिक्षक-शिक्षिका घरातला राग विद्यार्थ्यांवर काढतात असे समोर आले आहे. त्यामुळे तुमच्या घरातील भांडणे घरातच मिटवा. तो असा बाहेर काढू नका, अशा कानपिचक्या शिक्षकांना अजित पवार यांनी दिल्या.