पुणे : अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अफगाणी विद्यार्थ्यांना दिले. आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरहद संस्थेच्यातीने आयोजित महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यासोबत येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे संवाद साधला.
सामंत म्हणाले, अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाही. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक विचार करुन आवश्यक ती मदत केली जाईल. व्हिसा बाबत केंद्र सरकारच्या परवानगी बाबत चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलंय.
केंद्रांत असूनही केंद्राचं ऐकत नाहीत त्यावर केंद्रांनच कारवाई करणे अपेक्षित
कोकणात काही राजकारणी कार्यक्रम घेतात. तेव्हा हे कोरोनाचे नियम पाळत नाही. त्याला आम्ही काय करणार. असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने कोरोना नियम पाळले जातील असे कार्यक्रम अरेंज केले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी ऐकण्याची गरज आहे. मुख्यमंत्री यांनी सांगितलंय गर्दी करू नका, केंद्रानेही मुख्यमंत्री यांचं ऐकलं. काही लोक केंद्रांत असूनही केंद्राचं ऐकत नाहीत त्यावर केंद्रांनच कारवाई करणे अपेक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत.
उद्धव साहेब आणि राज्य सरकार यांच्यावर यांच्यावर टीका करण्याच्या उद्देशाने यात्रेचे आयोजन
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आणि राज्य सरकार यांच्यावर यांच्यावर टीका करण्याच्या उद्देशाने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महविकास आघाडीच्या मंत्र्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. हि यात्रा राजकारणाचा भाग होऊ नये याचा विचार करायला पाहिजे होता. जनाचा आशीर्वाद मिळेल अशीच जनआशीर्वाद यात्रा करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.''