शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 7:23 PM

कोविड - १९ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे.

बारामती: पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड सेंटर बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असताना कोरोना रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी तालुका ठिकाणची कोविड सेंटर बंद करू नयेत अशी मागणी माजीमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार, राज्यशासन हे कोविडची तिसरी लाट येणार असून त्यास तोंड देण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज असल्याची माहिती देत आहे. अशी काळजीची परिस्थिती असताना शासनाकडूनच चक्क कोविडचे रुग्ण कमी झाल्याचे कारण देत पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर दि.१ सप्टेंबरपासून बंद करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे.     

इंदापूर येथीलही कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रुग्णांना आता उपचारासाठी थेट बारामती येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इतक्या लांब ठिकाणी रुग्णांची व जनतेची गैरसोय होणार  नाही का? शासनास हे समजत नाही का? असा सवाल ही पाटील यांनी उपस्थित केला आहे.  इंदापूर येथील कोविड सेंटर बंद करणे ही शासनाने तालुक्यातील जनतेची चालवलेली चेष्टा असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. इंदापूर तालुक्यात सध्या सुमारे ४० ते ५० च्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत, तर काहींना दुदैर्वाने जीवही गमवावा लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सुरू राहण गरजेचे आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.----------------------जनतेच्या आरोग्याशी खेळ... कोविड - १९ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या आरोग्य व्यवस्था मजबूत करणे  महत्त्वाचे असताना, शासनच आहे ती पदे रद्द करून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे.  शासनाने हा पोरखेळ थांबवावा. केंद्र सरकारला काही झाले की जबाबदार धरू नये. राज्य शासनाने स्वत: जबाबदारी घेतली पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.----------------------शासन स्तरावर वरिष्ठांना भेटणार... कोरोनाचे निर्बंध आणखी कडक  करण्याचा इशारा मुख्यमंत्री देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात गंभीर दिसत आहेत. कोरोना रुग्णांवरती तालुक्यामध्ये जवळच तात्काळ चांगले उपचार मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या निर्णया संदर्भात आम्ही शासनस्तरावर वरिष्ठांची भेट घेणार असून, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना केअर सेंटर बंद करू देणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे._________--------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारharshvardhan patilहर्षवर्धन पाटील