शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यानेच राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव : भाजपचे जोरदार टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 7:09 PM

शहरातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना देखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा केला जात आहे.

पुणे: पुण्यातील वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यात येणारी अडचण यावरून पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्षांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. एकमेकांवर टीकेची एकही संधी दोन्हीही बाजूने सोडली जात नाही. आता पुण्यातील ससून रूग्णालय सोडून अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार काहीही काम करत नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच शहरातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना देखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा केला जात आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानेच महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करत आहे, असे टीकास्त्र पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. 

भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बुधवारी( दि. २८) कोरोनाची परिस्थितीबाबत भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,  शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गटनेते गणेश बिडकर, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी खासदार बापट म्हणाले,‘ पुणे शहराच्या विविध भागांंमध्ये महापालिकेने १८४ लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच लस केंद्रावर त्यांची गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. त्यात लसीकरणासंदभात सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना दुसरा डोस सहज उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. 

मुळीक म्हणाले, शहरात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण करण्यात सुरु होणार आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत. पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. नागरीकांमध्ये नोंदणी, जनजागृती आणि लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यास तयार आहेत.’... 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रूग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केेली पाहिजे. असे सडेतोड प्रत्युतर मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना दिले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाState Governmentराज्य सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे