पुणे : राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी, तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याकारता जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालयीन युवाशक्तीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विषयामध्ये सक्रिय सहभागी करून घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सन २०११पासून ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’ ही तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी दिली.या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते स्पर्धक हे जिल्हास्तरावरील स्पर्धेकरिता पात्र ठरतील. यंदा तालुकास्तरावर ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’ १८ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर, जिल्हास्तरावर ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’ ही ६ जानेवारी ते १० जानेवरी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (ग्रा.पा.पु.), विस्तार अधिकारी आणि आयोजन करणाºया महाविद्यालयाचे प्राचार्य, अशी पाच सदस्यांची समिती असून, गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते काम पाहणार आहेत, असे अमर माने यांनी सांगितले.
राज्य सरकारतर्फे पुणे जिल्ह्यात ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’; विजेत्यांना प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:21 PM
राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी, तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याकारता जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ठळक मुद्देस्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते स्पर्धक हे जिल्हास्तरावरील स्पर्धेकरिता पात्रतालुकास्तरावर १८ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत होणार स्पर्धा