पुणे: कोरोना टाळेबंदीमुळे रखडलेल्या मेट्रोला राज्य सरकारने आता अल्टिमेटम दिला आहे. येत्या ६ महिन्यात दोन्ही प्राधान्य मार्ग व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्याबाबत त्यांंनी महामेट्रो प्रशासनाला आदेश दिले आहेत. प्रशासनाने याला दुजोरा दिला.
पिंपरी- चिंंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी अशा ३१ किलोमीटर अंतराच्या दोन मेट्रो मार्गांचे काम मागील २ वर्षांपासून सुरू आहे. यात पिंपरी ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय हे प्रत्येकी ५ किलोमीटरचे मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. याच मार्गांबाबत उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांंनी ते सहा महिन्यात सुरू करण्याबाबत मेट्रो प्रशासनाला सांगितले आहे. महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ यांनी याला दुजोरा दिला.या दोन्ही मार्गांचे काम गतीने सुरू होते, मात्र कोरोना टाळेबंदी व नंतर २ हजारपेक्षा अधिक कामगार त्यांच्या राज्यात गेल्यामुळे चार महिने रखडले. आता ते परत सुरू झाले आहे. पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाची मेट्रो कोचसहित चाचणीही झाली आहे. वनाज ते गरवारे मार्गावर एसएनडीटी महाविद्यालयाच्या वळणाजवळ थोडे काम बाकी आहे. दोन्ही मार्गांवर प्रत्येकी ५ याप्रमाणे स्थानके आहेत, मात्र सध्या त्यातील तीनच सुरू करण्यात येतील. ऊर्वरीत स्थानकांचे काम सूरू आहे. हे दोन्ही प्राधान्य मार्ग व्यावसायिक तत्वावर सुरू करण्याचे आदेश ऊपमु्ख्यमंत्री पवार यांंनी दिले आहेत. ते शक्य आहे असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्धानकांची कामे अपूरी असली तरी दोन्हीकडचे मेट्रो मार्ग ९० टक्के पुर्ण झाले आहेत. पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर सिग्नलिंग यंत्रणाही बसवली आहे. वनाज ते गरवारे मार्गावरही लवकरच मेट्रो कोचसह चाचणी घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग विहित मुदतीत सुरू करणे शक्य असून त्याप्रमाणे सर्व कामांचे नियोजन केले असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
असे असतील तिकीट दरपहिल्या २ किलोमीटरला- १० रूपये२ ते ४ किमी- २०४ ते १२ किमी- ३०१२ ते १८ किमी- ४०
मेट्रो सुरू झाल्यानंतर पहिले वर्ष हेच दर कायम असतील. त्यात वाढ करता येणार नाही.