शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

१८ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 3:55 PM

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांतर्फे १८ फेब्रुवारी रोजी रामस्मृती लॉन्स, भोसरी - आळंदी रोड, भोसरी पुणे येथे ‘१२ वे राज्यस्तरीय अधिवेशन २०१८‘ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून या सत्रादरम्यान विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

- हनुमंत देवकरचाकण -  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांतर्फे १८ फेब्रुवारी रोजी रामस्मृती लॉन्स, भोसरी - आळंदी रोड, भोसरी पुणे येथे ‘१२ वे राज्यस्तरीय अधिवेशन २०१८‘ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून या सत्रादरम्यान विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आहेत, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. रा. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने राहतील. प्रमुख अतिथी म्हणून दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, म. रा. मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रमुख मुंबईचे रणधिर कांबळे, वृत्तवाहिनी विभाग प्रमुख मनिष केत यांची उपस्थिती राहणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११.३० वाजता ‘’माध्यमांचे बदलते स्वरुप’’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दैनिक लोकमत पुणेचे संपादक विजय बाविस्कर, दै. लोकमंथन समुहाचे अशोकराव सोनवणे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशिदास भोईटे, मिरर टाइम्स नाउु चे वरिष्ठ वृत्त संपादक मंदार फणसे, दैनिक जनशक्ती पुणेचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेदुसरे सत्र दुपारी ३ ते ६ या कालावधीत पार पडेल. यावेळी ‘स्वातंत्र सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे’ आयोजन करण्यात आले असून दै. पुण्यनगरीचे समुह संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगाटे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजबाबू दर्डा यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर भूषवणार आहेत. यावेळी दिंडोरीचे चंद्रकांतदादा मोरे, कृ. उ. बा.स. पुणे प्रशासक बी. जे. देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी परिवहन राज्यमंत्री दिवाकर राते, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खा. अमर साबळे, खा. श्रीरंग बारणे, आ. गौतम चाबुकस्वार, दै. जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके आदी उपस्थित राहणार आहेत.सदर १२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला तसेच आयोजित चर्चासत्र व कार्यक्रमाला बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म. रा. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष सर्वश्री राजेंद्र वाघमारे, वृतवाहीनी संघाचे अध्यक्ष मनिष केत, सोमनाथ देशकर, कुंदन पाटील, राकेश टोळ्ये, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्क प्रमुख अ‍ॅड. हर्षल कुमार चिपळूणकर, नितीन शिंदे, मंत्रालय संपर्क प्रमुख खंडुराज गायकवाड, नितीन तोरसेकर, वृत्तवाहिनी संपर्क प्रमुख उमेश कुणकर्णी, प्रदेश सहचिटणीस सुरेखा खानोरे, विभाग प्रमुख व्यंकटेश दुधमवार, अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश सोमाणी, हल्ला विरोधी समिती प्रमुख ईश्‍वरसिंग ठाकुर, कोकण विभागीय अध्यक्ष किरण बाथम, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, सांस्कृतीक विभागीय अध्यक्ष संदिप भटेवरा, नंदुरबार धुळे जळगाव विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, पश्‍चिम महाराष्ट्र सहचिटणीस सतिष सावंत, मराठवाडा सहसचिव बाळासाहेब लोणे, पुणे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष किरण जोशी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, शांताराम हिंगणे, उमेश ओव्हळ आदींसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

टॅग्स :Journalistपत्रकारMaharashtraमहाराष्ट्र