गाजरे यांचे शैक्षणिक कार्यात बहुमोल असे योगदान आहे. त्यात लेझीम तज्ज्ञ, स्कॉलरशिप परीक्षा, तसेच त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची अधिकारीपदी निवड झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हास्तरीय कविता गायन, शैक्षणिक साहित्य, लोकनृत्य अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. मैत्रा फाउंडेशनचे अध्यक्ष द. ल. वारे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. पुरस्कार जाहीर झाल्याने जांबूत येथे माजी आमदार पोपटराव गावडे, जि. प. सदस्या सुनीता गावडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, माजी सरपंच डॉ. जयश्री जगताप, काठापूरचे सरपंच बिपीन थिटे, माजी सरपंच बाबा फिरोदिया, बाळासाहेब फिरोदिया, जालिंदर पठारे, जांबूत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
२५ टाकळी हाजी
जांबूत येथे लहू गाजरे यांचा सन्मान करताना माजी आमदार पोपटराव गावडे व ग्रामस्थ.