राज्यात ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबविणार; पिंपरीतील जम्बो कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:21 AM2020-08-27T02:21:32+5:302020-08-27T12:15:30+5:30

जम्बो सेंटरमुळे कोणत्याही रुग्णास खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची गरज भासणार नाही. या सेंटरच्या माध्यमातून पुण्याचा अडीच टक्के असलेला मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.

The state will launch a ‘Chase the Virus’ campaign; Dedication of Jumbo Kovid Hospital at Pimpri | राज्यात ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबविणार; पिंपरीतील जम्बो कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

राज्यात ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबविणार; पिंपरीतील जम्बो कोविड रुग्णालयाचे लोकार्पण

Next

पिंपरी (पुणे) : कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत सुरू केलेली ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राज्यभरात सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. त्यामुळे बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करता येतील. त्यामुळे साथीवर आणि मृत्युदरावरही नियंत्रण मिळविता येईल, असे यांनी स्पष्ट केले.

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या.

ठाकरे म्हणाले, ‘मुंबईमध्ये चेस द व्हायरस ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यातही ही मोहीम सुरू करण्यात येईल. संभाव्य रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजून त्याला बाधा होण्यापूर्वीच उपचार मिळतील. याशिवाय आवाजावरून कोरोनाची निदान करण्याची पद्धत वापरली जात आहे. मुंबईत त्याची चाचणी सुरू झाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास राज्यभर ही पद्धत वापरली जाईल.’पावसाळा हा साथ रोगांचा काळ असतो. कोरोना व पावसाळयातील साथीच्या रोगांनी डोके वर काढल्यास भयंकर स्थिती निर्माण होईल. त्या पार्श्वभूमीवर लवकरच मार्गदर्शक सूचना काढण्यात येईल.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जम्बो सेंटरमुळे कोणत्याही रुग्णास खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची गरज भासणार नाही. या सेंटरच्या माध्यमातून पुण्याचा अडीच टक्के असलेला मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. या दोनही सेंटरचा उपयोग शहरांबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाईल.

...तर, हॉस्पिटलला पाच पट दंड आकारावा - टोपे
जास्त पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर बिलाच्या पाच पटीने पैसे वसूल करावेत. प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्यावर उपचार करावेत. लवकरात लवकर रुग्णाचे निदान हिल यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे  राजेश टोपे यांनी केली.

Web Title: The state will launch a ‘Chase the Virus’ campaign; Dedication of Jumbo Kovid Hospital at Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.