या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर म्हणाले की, सरकारने येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास संभाजी ब्रिगेड दौंड व सकल मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदशनाखाली तसेच पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली दौंड ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढणार आहे.
या वेळी संभाजी ब्रिगेड दौंड तालुका अध्यक्ष कुलदीप गाढवे, शहराध्यक्ष गणेश भोसले, शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नीलेश जांबले, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विजय भोसले,उपाध्यक्ष स्वरुप ताकवणे, संघटक भूषण शितोळे, सरचिटणीस संतोष भोसले, सचिव उमेश हांडे, शुभम गाडेकर, सोमनाथ इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--
फोटो : १९ पाटेठाण मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देताना कार्यकर्ते
===Photopath===
190621\19pun_1_19062021_6.jpg
===Caption===
१९ पाटेठाण मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देताना कार्यकर्त