यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांनी सांगितले की विजजोड तोडण्याचे कोणतेही आदेश नसताना वीज तोडले जात आहेत.
मार्च महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी वीजबिल भरलेले आहे, त्यांनतर देखील एक हप्ता भरलेला आहे, सध्या कोरोनाच्या या महामारीच्या रोगामुळे शेतकरी अडचणीत सापडत चालला आहे. या परिसरात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, ऊस लागवडीवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली गेली आहे. काही शेतकऱ्यांच्या ऊस लागवडी सध्या चालू आहेत. अद्याप काही भागात समाधानकारक पाऊस पडला नसल्यामुळे शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये महावितरण कडून आलेले शेतकऱ्यांना जास्त रकमेची विज बिले त्यामुळे शेतकऱ्यांचा थकबाकीचा आकडा विनाकारण फुगलेला आहे.
त्यामुळे शिरूरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या लाईट बिले दुरुस्ती करावी असे गदादे यांनी सांगितले.
या वेळी पोपटराव गदादे, महादेव फराटे, विश्वास फराटे, शिवाजी गदादे, नवनाथ गदादे, सागर खोरे, गणेश गदादे, दत्तात्रेय खोरे, दत्तात्रेय ससाणे, नितीन गदादे, मोहन गदादे, राहुल शितोळे, बयाजी गदादे, अरुण कुलकर्णी, दत्तात्रय नलगे, राजेन्द्र कळसकर, दिपक गदादे, लखन गदादे, सतीष गदादे, संजय कुलकर्णी, हरिभाऊ घोरपडे, देवीचंद गदादे, शरद गदादे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते .