निवेदनात म्हटले आहे की, गावठाणातील लोकवस्तीत खेटून वेळ नदीपात्रात वैकुंठभूमीलगत असणारा कचरा प्रश्न तातडीने, पळवाट व सामान्य जनतेची दिशाभूल न करता विनाविलंब व अतितातडीने हलविण्याबाबत मागणी करण्यात आली. गावातील सर्व वॉर्डांमधील सर्व कचरा मुख्य गावात आणून टाकला जात असून, शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल, ढाबे, चायनीज गाड्या व इतर व्यावसायिक, हॉस्पिटल, मोठ्या सोसायट्या, प्लॉटिंगधारकांचा कचरा, मेसवाले, असे एक ना अनेक प्रकारचा कचरा शिक्रापूर ग्रामपंचायत वाहनांमधून घंटागाड्यांमधून हा कचरा गोळा करून टाकण्यात येतो. या कचऱ्यामुळे घाण वास, धूर येतो. मोकळ्या पद्धतीने कचरा टाकल्यामुळ मोकाट जनावरे, कुत्रे, पशूपक्षी, पाळीव प्राणी या कचऱ्यातील खाद्य खाण्यासाठी येत असून, या मुक्या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
येथे कचरा पेटवून दिला जात असल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर व प्रदूषण तयार होऊन गावठाण व आजूबाजूचा दोन किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना ठसका, खोकला ,फुफ्फुसाचे आजार, डोळ्यांची जळजळ, दमा यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
या वेळी शिक्रापूर माहिती सेवा समिती शिरूर तालुका अध्यक्ष संतोष काळे, कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, विजय लोखंडे, अंकुशराव घारे व काही ग्रामस्थांनी दिला.
फोटो : शिक्रापूर ता. शिरूर येथील कचरा प्रश्न मार्गी लावा यासाठी ग्रामविकास आधिकारी यांना निवेदन देताना. (धनंजय गावडे )