- सुषमा नेहरकर-शिंदे, पुणेराज्यातील जमीन व्यवहारांची १८३६पासूनची जुनी कागदपत्रे ठेवलेली रेकॉर्ड रूमच अडगळीत पडली असून, रेकॉर्ड गायब केले किंवा आग लावून नष्ट केले तरी त्याबाबत कोणतीही सुरक्षा ठेवण्यात आली नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दिसून आले आहे. जमिनीचे व्यवहार करताना अनेकदा जुन्या नोंदी तपासाव्या लागतात. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील ब्रिटिशकाळापासून नोंदी असलेले रेकॉर्ड फोटो झिंकोमधील दुय्यम निबंधक कार्यालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, या कार्यालयाला कोणतीही सुरक्षा नाही. अस्ताव्यस्त पडलेले दस्त, प्रचंड जळमटे, बंद पडलेले संगणक व मोडक्या खुर्च्या, टेबल, गोण्यांमध्ये खचाखच भरलेली रद्दी, सिमेंट आणि राडारोडा असलेली पोती व सताड उघडी दारे, अशी या कार्यालयाची अवस्था आहे. कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून गेल्यावर रेकॉर्ड रूम कुलूप लावून बंद असलेली दिसते. मात्र, इमारतीच्या मागील बाजूच्या जिन्याने कोणीही येथे प्रवेश करू शकते. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश केला तरीही त्यांना हटकण्यास कोणी नव्हते. इंग्रजांनी तांत्रिक पद्धतीने तयार केलेली दस्तनोंदणी संदर्भातील कागदपत्रे येथे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अत्यंत जुने म्हणजे १८३६ ते २००२ पर्यंतचे लाखो दस्तनोंदणीचे कागद ठेवण्यात आले आहेत. संगणकीकृत दस्तनोंदणी सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील दस्त येथील कार्यालयात स्कॅनिंगसाठी पाठविण्यात येते होते. त्यामुळे संपूर्ण राज्यातील दस्तनोंदणीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे येथील रेकॉर्ड रूममध्ये आहेत. मुंबई, औरंगाबाद अशा पद्धतीने जिल्हानिहाय रेकॉर्ड आहे. नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठीही येथे काही सुविधा नाही. कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याची गळतीही येथे होत आहे.केबिनसाठी कोट्यवधी खर्च : रेकॉर्ड रूमकडे दुर्लक्षसध्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात महानिरीक्षकांच्या कार्यालयापासून सर्वच विभागांच्या, दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कार्यालयांना चकाचक व कॉर्पोरेट लुक देण्यात येत आहे. मात्र, रेकॉर्ड रूमकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण रेकॉर्ड स्कॅनिंग करून संगणकीकरण करण्याचे ठरविले होते; मात्र तेही काम अपूर्ण आहे. अस्ताव्यस्त पडलेले दस्त, प्रचंड जळमटे, बंद पडलेले संगणक व मोडक्या खुर्च्या, टेबल, गोण्यांमध्ये खचाखच भरलेली रद्दी, सिमेंट आणि राडारोडा असलेली पोती व सताड उघडी दारे, अशी या कार्यालयाची अवस्था आहे. ब्रिटिशकाळापासून असलेले रेकॉर्ड सध्या येथे कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सिमेंटच्या गोणी, राडारोडा भरलेली पोती, इतर अनावश्यक साहित्य रेकॉर्ड रूममध्येच टाकण्यात आले आहे.कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याची गळती रेकॉर्ड रूममध्ये होत आहे. येथील रेकॉर्ड रूममध्ये मुंबई विभाग, औरंगाबाद विभाग असे जिल्हानिहाय रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. अगदी ब्रिटिशकाळापासून असलेले येथील रेकॉर्ड अत्यंत भयानक स्थितीत पडले आहे. ब्रिटिशकाळापासून असलेले रेकॉर्ड सध्या येथे कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सिमेंटच्या गोणी, राडारोडा भरलेली पोती, इतर अनावश्यक साहित्य रेकॉर्ड रूममध्येच टाकण्यात आले आहे.कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याची गळती रेकॉर्ड रूममध्ये होत आहे. येथील रेकॉर्ड रूममध्ये मुंबई विभाग, औरंगाबाद विभाग असे जिल्हानिहाय रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. अगदी ब्रिटिशकाळापासून असलेले येथील रेकॉर्ड अत्यंत भयानक स्थितीत पडले आहे. इंग्रजांनी तांत्रिक पद्धतीने तयार केलेल्या दस्तनोंदणीसंदर्भातील कागदपत्रे येथे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अत्यंत जुने म्हणजे १८३६ ते २००२ पर्यंतचे लाखो दस्तनोंदणीचे कागद ठेवण्यात आले आहेत. संगणकीकृत दस्तनोंदणी सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील दस्त येथील कार्यालयात स्कॅनिंगसाठी पाठविण्यात येते होते. पालिकेचे रेकॉर्ड तकलादू सुरक्षेच्या भरवशावर पुणे : महापालिकेचे तब्बल पन्नासहून अधिक वर्षांचे रेकॉर्ड नाना वाड्यात तकलादू आग प्रतिबंधात्मक यंत्रणेच्या भरवशावर अवलंबून आहे. या रेकॉर्डच्या सुरक्षेसाठी वाड्यात ज्या-ज्या खोल्यांत हे रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे, त्यांच्या बाहेर प्रत्येकी एक फायर एस्टिंगविशर बसविण्यात आले असून, अनेक एस्टिंगविशरची मुदतही संपलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी एखादी आगीची दुर्घटना घडल्यास रोखणार कशी, हा मोठा प्रश्न आहे.महापालिकेच्या स्थापनेपासूनची शेकडो कागदपत्रे प्रशासनाकडून नाना वाड्यात ठेवण्यात आली आहेत. त्यात बांधकाम, पथ विभाग, आरोग्य विभाग, भूसंपादन आणि व्यवस्थापन विभाग या प्रमुख विभांगासह इतर विभागांचेही रेकॉर्ड आहे. या वाड्यात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी करण्यासाठी एक रजिस्टर ठेवण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी अनेकदा कोणीच नसते. तर, रेकॉर्ड ठेवलेल्या रूममधील कर्मचारीही अनेकदा गायब असतात. यामुळे या ठिकाणचे रेकॉर्ड सहज गायब करणे शक्य आहे. याशिवाय, हे रेकॉर्ड जुने असल्याने एखाद्या शॉर्ट सर्किट अथवा लहानशा ठिणगीनेही पेट घेऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी सक्षम अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाकडून प्रत्येक खोलीबाहेर एक फायर एस्टिंगविशर बसविण्यात आल्याने आगीसारखी घटना घडल्यास ती रोखणे अशक्य असल्याचे या पाहणीत दिसून आले.
राज्याचे ‘रेकॉर्ड’च असुरक्षित !
By admin | Published: February 25, 2016 4:15 AM