शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आधार नोंदणीसाठी उसळली गर्दी : नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:37 AM

आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीच्या दोन दिवसीय कामकाजाला धनकवडी येथील क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.

धनकवडी : आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीच्या दोन दिवसीय कामकाजाला धनकवडी येथील क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी तसेच दुरुस्तीचे दोन दिवसीय शिबिराला सकाळी दहा वाजता धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात सुरुवात झाली आहे.आधार कार्डामध्ये दुरुस्ती बरोबरच नोंदणीलादेखील खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दीदिसून येत होती. येथे क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी सहा मशीन येणार होत्या. मात्र सकाळी चारच मशीन पोहोचल्या. तसेच दुपारनंतर एक मशीन मिळाल्यामुळे गर्दी आवाक्यात आली.याबद्दल क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त युनुस पठाण यांनी सांगितले, की या ठिकाणी सहा मशीन येणार होत्या. मात्र सकाळी चारच मशीन पोहोचल्या होत्या. सकाळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या वतीने काही दिवसांतच महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये कायमस्वरूपी एक मशीन आॅपरेटर मिळणार आहे.याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी सांगितले, की अनेक नागरिकांची अद्याप आधार कार्ड नोंदणीच झालेली नाही. तसेच सुरुवातीच्या काळात घाईगडबडीत अनेक नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीमध्ये नाव पत्ता तसेच जन्मतारीख यामध्ये चुका झालेल्या आहेत.खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना आधार कार्ड संदर्भात काम आहे. यात एका मशीनवर एका दिवसात जास्तीत जास्त ६० लोकांचीच नोंदणी किंवा दुरुस्ती होत असते. आताच्या उपलब्ध मशीन प्रमाणे दोन दिवसांत पाचशे ते साडेपाचशे लोकांच्या आधार कार्डाचे काम होऊ शकणार आहे. आज दिवसभरात नोंदणी/दुरुस्तीसाठी हजाराच्या वर नागरिक केंद्रात पोहोचले मात्र गर्दी व रांग पाहून माघारी वळले.आधार कार्ड सर्व ठिकाणी अनिवार्य केल्याने याच्या नोंदणीसाठी खासगी केंद्रांवर नोंदणी किंवा दुरुस्तीसाठी २०० ते ३०० रुपये वसूल केले जात आहेत. प्रशासनाने तत्काळ मशीन व केंद्रांची संख्या वाढवल्यास नागरिकांची लूट थांबणार आहे.

टॅग्स :Puneपुणे