शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

निवडणुकीच्या दिशेने एक ‘कदम’

By admin | Published: March 01, 2016 1:46 AM

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी विविध योजनांची खैरात करणारे करणारे, १०० बसची खरेदीची तरतूद करण्यात आलेले

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी विविध योजनांची खैरात करणारे करणारे, १०० बसची खरेदीची तरतूद करण्यात आलेले ५ हजार ७४८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सोमवारी मुख्य सभेला सादर केले. आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने ५४९ कोटींची वाढ केली आहे. महापालिकेचे २०१६-१७ या वर्षासाठी स्थायी समितीने तयार केलेले अंदाजपत्रक मुख्य सभेसमोर मांडण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अंदाजपत्रक असल्याने पुणेकरांना ‘फिल गुड’ अशा योजनांचा समावेश या अंदाजपत्रक करण्यात आला आहे. मागील वर्षी स्थायी समितीने ४ हजार ४७९ रुपयांचे अंदाजपत्रक मांडले होते, त्यामध्ये या वर्षी १ हजार २६९ हजारांनी वाढ झाली आहे. आयुक्तांनी विविध विभागांसाठी दिलेल्या निधीमध्ये काटछाट करून जाहीर करण्यात आलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. शरद वाय-फाय योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात महापालिकेच्या वतीने वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ८वी ते १०वीच्या १२ हजार विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हरित बनविणे, निर्भया सुरक्षा पथक, संतसृष्टी शिल्पाची उभारणी, मराठी भवनाची निर्मिती, क्रीडा संकुल उभारणी, सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे शिल्प, ई वेस्ट कलेक्शन सेंटर, ५ आजारांकरिता महापालिकेकडून विशेष अर्थसाह्य, पर्वती येथे पेशवाई सृष्टीची उभारणी, तळजाई येथे आॅक्सिन पार्क, तारांगण आणि मत्स्यालय, पक्षी निरीक्षण केंद्राची उभारणी आदी योजना व प्रकल्पांची घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. १. विकलांग मुलांसाठी दरमहा दोन हजार रुपयांचे अर्थसाह्य२. ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा एक हजार अर्थसाह्य३. विधवा, निराधार महिलांसाठी दरमहा १ हजाराचे अर्थसाह्य४. संपूर्ण शहरात वाय-फाय सुविधा देण्यासाठी शरद वाय-फाय योजना५. शिक्षण मंडळाच्या ८वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब६. सीएनजीच्या १०० बसची खरेदी७. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हरित बनविणार८. निर्भया सुरक्षा पथकाची स्थापना९. संतसृष्टी शिल्पाची उभारणी१०. मराठी भवनाची निर्मिती ११. सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे शिल्प१२. तळजाई येथे आॅक्सिजन पार्क, तारांगण, मत्स्यालय१३. पाच आजारांवरील उपचारासाठी विशेष अर्थसाह्य१४. पर्वती येथे पेशवाई सृष्टीची उभारणी१५. पक्षी निरीक्षण केंद्राची उभारणी१ सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सीएनजी युरो -४ च्या १०० बसेस खरेदी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. महापालिकेकडून माता रमाई बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत निराधार, विधवा महिलांसाठी दरमहा १ हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे.२ ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १ हजार रुपये देण्याकरिता शरद स्वावलंबन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन योजनांची घोषणा करण्यात आली. विकलांग मुलांच्या आरोग्याच्या व इतर मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी डॉ. बाबा आमटे योजनेअंतर्गत दरमहा २ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे.