अंगारकी चतुर्थी निमित्त पायरी
दर्शनासाठी मोरगांवला भावीकांची गर्दी
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथे आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने कळस व पायरी दर्शनासाठी भावीकांनी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजलेपासून भावीकांची मंदीयाळी सुरु होती. तालुक्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त दर्शनासाठी आले होते. कोरोनामुळे गणेश भक्तांना या वर्षी सलग दोन अंगारीका चतुर्थीस मयुरेश्वराचे दर्शन मुकावे लागले आहे. त्यामुळे भावीकांकडून मंदिर कधी सुरु होणार असा सवाल करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.
आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने सकाळी गुरव मंडळींची पूजा झाली तर सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांची पूजा झाली. यानंतर धुपारती काढण्यात आली. यावेळी शेकडो भावीकांनी गर्दी केली होती. आज चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरा समोरील मुख्य पेठेतील दुकाने हार, दुर्वा, पेढे श्रींच्या प्रतीमांनी सजवली होती. कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे गेल्या सहा महीन्यापासून मंदिर बंद आहेत. मात्र संकष्टीची वारी वाया जाऊ नये म्हणून अनेक भक्त कळस व पायरी दर्शनासाठी येत आहेत. आज सकाळी श्रींस नैवेद्य दाखविण्यात आला.
दिवसभर जिल्हाभरातून भक्तांचा ओढा सुरूच होता. कोरोनामुळे राज्य शासनाच्या सुचनेनुसार मयुरेश्वर मंदिर बंद आहे. मंदीराचा दगडी चिरेबंदी फरस लोखंडी बॅरीकेट लावून बंद केला होता. मात्र पायरी दर्शनाच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता मुख्य पेठेतुन भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी बारा वाजता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने श्रींची पुजा करुन नैवेद्य दाखविण्यात आला.रात्री चंद्रोदयाच्या वेळेस आरती प्रसंगी निवडक पुजारी मंडळी उपस्थित होती. आरतीनंतर मयुरेश्वरास महानैवद्य दाखविण्यात आला.
————————————————
फोटो ओळी : भावीकांनी पायरी दर्शनासाठी लावलेली रांग.
२७०४२०२१-बारामती-०२
——————————————————
फोटो ओळी : मयुरेश्वराची आजची पुजा
२७०४२०२१-बारामती-०३
————————————————