प्रतीक सतीश अडसरे (वय २८, रा. बागलोहरे, नारायणगाव) याला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव येथील बागलोरे गावठाण या ठिकाणी प्रतीक अडसरे हा त्यांच्या राहत्या घराच्या समोर असलेल्या खोलीमध्ये घरगुती वापराच्या एचपी गॅस कंपनीच्या अवैध साठा करून या गॅस टाक्यांमधील एलपीजी गॅस हा लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या वाहनांमध्ये भरत आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे यांना बातमीदारांकडून मिळाली. पोलिसांनी पाहणी केली असता प्रतीक पळून जाऊ लागला, मात्र पोलिसांनी त्याला जागीच पकडले. त्याच्याकडून २७ एचपी गॅसटाक्या, एक इलेक्ट्रिक मोटर, एक गॅस भरण्यासाठी बॅटरीवर चालणारा पंप, एक वजनकाटा हे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक दिनेश साबळे, शेख, कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, सचिन कोबल, टाव्हरे यांच्या पथकाने केली.
घरगुती वापराचा एचपी कंपनीचा गॅस हा खासगी वाहनांमध्ये भरताना पकडलेला आरोपी सह नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे व पोलीस पथक.