(स्टार १२०५ डमी)
पुणे : जन्मलेला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सरकारला टॅक्स देत असतो. प्रत्येकाला ही जाणीव आहे. मात्र, कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या स्लॅबच्या प्रमाणात हजारो लोक हातावर पोट असणारे या टॅक्सच्या कक्षेत येतच नाही. मात्र, तरीही ते वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करताना राज्य तसेच केंद्र सरकारला कर भरत असतात.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. सध्या अनेकजण भाजीपाला विक्री, रिक्षा चालविणे, सफाई कामगार तसेच फेरीवाल्यांचे जगणे थोडेसे कठीण झाले आहे. मात्र, या सर्वांना दैनंदिन लागणाऱ्या गरजांसाठी वेगवेगळ्या प्रकारे कर हा शासनाला भरावाच लागत आहे. त्याशिवाय संबंधित यंत्रणेकडून वस्तूंची खरेदी करता येतच नाही.
----
* आपण टॅक्स भरता का?
१) महिन्याला १५ हजार रुपये मला पगार मिळतो. शासनाने ठरवलेल्या कर स्लॅबमध्ये माझा एवढा पगारच नाही. मात्र, कपडे, भांडी किंवा वस्तू खरेदी करताना कर भरावाच लागतो.
- रमेश शेवाळे, कामगार
---
२) कोरोनापूर्वी दिवसभर रिक्षा चालवून चांगले अर्थाजन व्हायचे. मात्र, कोरोना काळात व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पन्न एकदम निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे कर भरण्याची प्रचंड इच्छा आहे. मात्र, तेवढे उत्पन्नच मिळत नाही.
- योगेश कदम, रिक्षाचालक
----
३) भाजीपाला विक्रीमधून कसेबसे महिन्याकाठी पैसे मिळतात. त्यातून आमचे जगणं सुरू आहे. त्यामुळे कसला टॅक्स आम्हाला माहितीच नाही.
- हौसाबाई बिचुकले, भाजीपाला विक्रेत्या
---
* प्रत्येकजण टॅक्स भरतो
केंद्र शासनाने देशभर वस्तू व सेवा (जीएसटी) कर लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येकजण काहीना काही खरेदी करतच असतो. उदा. कपडे, वस्तू खरेदी केल्यावर किंवा बाहेर हॉटेलला जेवायला गेल्यास राज्य तसेच केंद्र शासनाला बिलावर जीएसटी भरावाच लागतो. त्यामुळे प्रत्येकजण कर भरत आहे.
- योगेश काळजे, करतज्ज्ञ, भाेसरी