केदार कदम
पाषाण : पाषाण तलाव सुशोभीकरण, दूषित पाणी रोखणे, पक्षी अभयारण्याच्या उद्देशाने पावले उचलणे या कामाबरोबरच तलावाची सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. पाषाण तलाव सुरक्षिततेच्या अभावी तळीरामांचा अड्डा बनला आहे. पाषाण तलावाच्या ११० एकर परिसरासाठी सुरक्षारक्षक कमी आहेत. रात्रीच्या वेळी तर सुरक्षारक्षकच नसतो. त्यामुळे तलाव परिसरात सर्रासपणे दारू पार्टी होतात.तलावाकडे ये-जा करणारे छुप्या रस्त्याने येऊन मद्यपार्ट्या होतात. पक्ष्यांची माहिती लावलेले फलक तोडण्यात आले आहे. त्यामुळे तलावावर असलेले छुपे रस्ते बंद करण्याची आवश्यकता आहे. रात्री अपरात्री येणारे तळीराम व प्रेमयुगुलांना आवरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा या ठिकाणी गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाषाण तलाव हा नेहमीच समस्येच्या वेढ्यात अडकलेला आहे. पाणी स्वच्छता, जॉगिंग ट्रॅकची देखभाल, वाढत असलेली जलपर्णी, याकडे कायमच प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येत आहे.तलावाच्या सुरक्षेचे तीन तेरापाषाण तलाव परिसरातील समस्या कधी सुटणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. पाषाण तलाव परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे तसेच या परिसरातील सुधारणांसंदर्भामध्ये स्मार्ट सिटीला देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसराची डेव्हलपमेंट व्हावी अशी मागणीदेखील केली आहे.- ज्योती कळमकर, नगरसेविकाएसटीपी प्लांटचे झाले काय ?पाषाण तलावाच्या सांडपाण्याच्या समस्येबाबत पुणे महानगरपालिका आयुक्तांची पाहणी ठेवण्यात आली होती. यानंतर एसटीपी प्लांट करण्यासाठीची प्रक्रिया करण्याचे आयुक्तांनी सांगितले होते. यासाठी अहवालदेखील करण्यात आला आहे. लवकरच या परिसरामध्ये पीएमआरडीए, स्मार्ट सिटी व पालिका यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातील.- अमोल बालवडकर, अध्यक्ष, औंध प्रभाग समितीतलावाचे प्रदूषण-सांडपाणी व जलपर्णीपाषाण तलाव परिसरात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पाणी दूषित होते. यामुळे पक्षी अभयारण्य असलेल्या पाषाण तलावात परिसरातील समस्यांमध्ये वाढ होत आहे. तलाव परिसरात जलपर्णीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत राहिले आहे . तलावात सोडले जाणारे दूषित पाण्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी पर्यावरणप्रेमींची मागणी असतानादेखील यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत .जॉगिंग ट्रॅकची दुरवस्थापाषाण तलावाच्या बांधावर जवळपास दोन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. नागरिकांना सकाळ संध्याकाळी व्यायामासाठी हा जॉगिंग ट्रॅक महत्त्वाचा ठरत असला तरी सध्या मात्र यावर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असल्याने नेमका जॉगिंग ट्रॅक कोठे आहे, हे शोधावे लागत आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला या जॉगिंग ट्रॅकची देखभाल करण्यास पालिका असमर्थ ठरत आहे.