सहकारनगर : इन्स्टाग्राम अकाउंटवर म्हणून मॅसेज आला व लगेच एक फोटो आला, तो फोटो फिर्यादी यांनी ओपन करून पाहिला असता त्या मध्ये त्यांच्या १९ वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट होता. तो फिर्यादी यांनी पाहिला लगेच पाठवणाऱ्यांनी तो डिलीट केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या भावाच्या मैत्रीणीचा फिर्यादी यांना फोन आला व तीने सांगितले की, फिर्यादी यांचा भाऊ यास कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युड व्हिडीओ कॉल करून, ब्लॅकमेल करून पैसे मागीतल्याने त्याने ४५००/- रूपये दिले असून आरोपी व्यक्ती अजून पैश्याची मागणी करीत असल्याने फिर्यादी यांचा भाऊ खुप रडत आहे.
असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या भावास फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे फिर्यादी यास शंका आल्याने तो धावत नोकरीच्या ठिकाणावरुन घरी आला तो पर्यंत त्यांच्या भाऊ याने राहते बिल्डींगचे १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यांचे फिर्यादीवरून दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला गेला.
अशा प्रकारे महाराष्ट्र तसेच देशभर ऑनलाईन सेक्सटॉर्शन करून खंडणी मागण्याचा धुमाकुळ घातला आहे. देशात धुमाकुळ घालणाऱ्या राजस्थान मधील गुरूगोठडी ता.लक्ष्मणगढ जि. अलवर मधुन यंत्रणा चालविणाऱ्या मास्टरमाईंड आरोपी नामे अन्वर सुबान खान वय २९ वर्षे रा. गुरूगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य राजस्थान यास दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने तांत्रीक विश्लेषन करून व लोकेशनव्दारे शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यास घेऊन जात असतांना आरोपीच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी पोलीसांना विरोध केला. पोलीसांवर दगडफेक करुन आरोपीस पळवून लावले असता त्या आरोपीचा २.५ कि.मी पाठलाग करून, जीवाची पर्व न करता दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने पाच मोबाईल सह आरोपीस ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता त्यागावातील सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सटॉर्शन चे प्रशिक्षण घेवून अशा प्रकारे नागरीकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रमाण गुरुगोठडी ता.लक्ष्मणगढ जि.अलवर (राजस्थान) गावात मोठया प्रमाणात चालते.
अशा प्रकारे सध्या तरूण पीढी ऑनलाईन सेक्सटॉर्शनला बळी पडून स्वतःचे जीवन संपवित आहे. तरी नागरीकांनी अशा ऑनलाईन सेक्सटॉर्शनला बळी न पडता, भयभीत न होता निसंकोच जवळच्या पोलीस ठाणे सायबर गुन्हे तपास पथकाकडे तक्रार करावी. तसेच यापुर्वी ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर फोन नं. ०२०-२४२२०२०५ येथे संपर्क साधावा असे नागरीकांना पुणे पोलीसांकडून आव्हान करण्यात येत आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप- निरीक्षक अक्षय सरवदे, पोलीस अंमलदार काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव यांनी केली आहे.