पाटस (ता. दौंड) परिसरातील मोटेवाडा येथे धनगर बांधवांच्या बैठकीत ते बोलत होते.
मोटेवाडा येथे परंपरागत धनगर समाज वास्तव्याला आहे. तर या परिसरात १०० पेक्षा जास्त मेंढपाळ बांधव आहेत. सातत्याने मेंढपाळांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असून सदरचे हल्ले थांबले पाहिजेत. शासनाकडून आदिवासींना ज्या सवलती मिळतात त्याच सवलती बांधवांना मिळाल्या पाहिजे. याचबरोबरीने अठरा पगड जातींनादेखील न्याय मिळाला पाहिजे. धनगर समाज कष्टाळू आहे, असे शेवटी पडळकर म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीस पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके यांनी गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केला. या वेळी बाळासाहेब तोंडेपाटील, विकास कोळपे, बाबा कोळेकर, माणिक चोरमले, दादा भंडलकर, सचिन वायसे यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर बांधव उपस्थित होते.