शुक्रवार सकाळी बारामती बावडा या राज्यमार्गावरील निमसाखर येथील बसस्थानकासमोर काही काळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचा विजय असो! कोण म्हणतो देणार नाय , घेतल्याशिवाय राहणार नाय! अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी शिवसेनेचे नितीन कदम, हर्षल रणवरे, नंदकुमार रणवरे, पोपट कारंडे, शिवाजी पानसरे यासह अन्यची भाषणे झाली. या प्रकल्पाला सोलापूर जिल्ह्यातील काही विरोधक या प्रकल्पाला स्वार्थापोटी विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध यावेळी केला. यावेळी सरपंच धैर्यशील रणवरे, ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल जाधव, उद्योजक संतोष रणसिंग, रामभाऊ रणसिंग, गोरख शेळके, दीपक लवटे, संजय जाधव, सुदाम वावरे यासह अन्य कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निमसाखर येथे ५ टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय रद्द झाल्याबद्दल निषेध करत रास्ता रोको करणारे शेतकरी.