कोरोना, आस्मानी संकट, त्याचबरोबर बाजार भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलडमली आहे. अशातच महावितरणने थकबाकी भरण्यासाठी तगादा लावला आहे. दरम्यानच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही महावितरणकडून वीज तोडणी मोहिम सुरुच आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्याची डागडुजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने महावितरणची मोहिमेला थांबावे तसेच वीज बिल भरण्यासंदर्भात तोडगा काढावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
रास्तारोको करण्यात आल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे आंदोलनस्थळी येत वाहनांची एक लेन चालू ठेवा असे म्हणत आंदोलकांना एकाबाजूला हटवत होते. मात्र आंदोलक रास्ता रोको वर ठाम असल्याने पोलीस व आंदोलक यांच्या शाब्दिक चकमक उडाली नंतर पोलीस उप निरीक्षकांनी समजून सांगितल्यावर आंदोलकांनी रस्त्याची एक लेन चालू केली.
१९ सणसर
बारामती -इंदापूर रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेला रास्ता रोको.