शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

पुलाचे काम थांबल्याने अपघाताचा धोका

By admin | Published: May 20, 2016 2:17 AM

पुलाचे काम थांबल्याने भविष्यात ओढ्याला पूर आल्यास आजुबाजूच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

यवत : यवत स्टेशन परिसरात जुना कालव्याच्या वरील पुलाचे काम थांबल्याने भविष्यात ओढ्याला पूर आल्यास आजुबाजूच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.या वर्षी नुकतीच कालव्यातून दौड़ व हवेली तालुक्यातील शेतीला पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु जुन्या कालव्यातून पाणी सोडत असताना काही ठिकाणी नव्याने पूल बांधण्याची आवश्यकता आहे. अशा ठिकाणी कालव्याच्या पात्राचा प्रवाह बदलून तात्पुरत्या स्वरुपात कालवा बाजूने सुरु करण्यात आला आहे.ओढा बंद राहिल्यास पावसाचे पाणी पुढे जाणार तरी कसे हा प्रश्न आहे. भुलेश्वर परिसरात मोठा पाऊस झाल्यास डोंगराळ भागातील वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणावर या ओढयात वाहून येत असते.पावसाळा काही दिवसांवर आलेला असताना पाटबंधारे विभागाने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते याचे भान पाटबंधारे विभागाला राहिलेले नाही. सद्य परिस्थितीत यावर काय उपाय योजना करणार याचे कसलीही उत्तर अधिकारी देत नाही.>यवत रेल्वे स्टेशन नजिक कालव्याला ओढा ओलांडत असल्याने या ठिकाणी कालव्याचे पात्र बदलून त्या ठिकाणी नविन पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे.मात्र पुलाचे काम अर्धवट परिस्थितीत बंद करण्यात आले आहे.सद्य परिस्थितीत कालव्यातून पाणी वाहात आहे.कालव्याच्या भरावामुळे ओढ्याचे पात्र पुर्णत: बंद झाले आहे.