भोर : तालुक्यातील संगणक परिचालकांनी थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी भोर पंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महाऑनलाईन ली. संग्रामकक्ष व पंचायत समिती संग्रामकक्ष या दोघांत ग्रामविकास व जलसंघारण विभाग यांच्याकडे 2क्11च्या शासन निर्णयाप्रमाणो करार केला. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत संग्राम कक्षाची स्थापना केली. त्यात संगणक परिचालकाची नेमणूक केली. त्यांना दरमहा निर्धारित केलेल्या 8 हजारांपैकी महाऑनलाईन या कंपनीकडून पदवीधारक परिचालकांना 3 हजार 8क्क् रुपये व पदवीधारक नसलेल्यांना 3 हजार 5क्क् रुपये इतके तुटपुंजे मानधन दिले जाते. तेही सहा-सहा महिने दिले जात नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत कंपनीला अनेक वेळा निवेदन देऊनही तीन वर्षापासून मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मानधनाबाबत तक्रार केल्यास सेवेतून कमी करण्याची धमकी दिली जाते, असा अरोपही या वेळी आंदोलकांनी केला. संगणक परिचालकांना शासन सेवेत कायम करावे, वर्कऑर्डर रद्द करून कपात केलेले वेतन जमा करावे, 2क्क् रुपये शेअर म्हणून घेतले जातात त्याचा काहीच फायदा मिळत नाही, थकीत वेतनासह प्रत्येक
महिन्याचे वेतन 8 हजारांप्रमाणो द्यावे, प्रवासभत्ता मीटिंगभत्ता द्यावा, दाखल्यासाठी 3 रुपयांऐवजी 8 रुपये करावेत, महिला संगणक परिचालकाला प्रसूती रजा व इतर रजा वाढवून द्याव्यात अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, तहसीलदार, सभापती पंचायत समिती, ग्रामसेवक संघटना, महाऑनलाईन समन्वयक, आमदार यांना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)