लोकमत न्यूज नेटवर्कउरुळी कांचन : येथे सुरू असलेले मशिदीचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार येथील ज्येष्ठ नागरिक अरविंद शहा यांनी गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे केल्यावरून त्यांनी प्रत्यक्षात पाहणी व चौकशी करून काम तातडीने थांबवावे व अनधिकृतपणाने बांधकाम केलेले असेल तर कारवाई करण्याचे आदेश उरुळी कांचन ग्रामपंचायतीला सोमवारी (दि. ८) दिले आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या समोर हाकेच्या अंतरावर बांधण्यात येणाऱ्या मशिदीच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने दिलेली परवानगी व परवानगीनंतर प्रत्यक्षात सुरू असलेले बांधकाम या सर्व गोष्टींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मशिदीचे बांधकाम अनधिकृत असल्यास त्या बांधकामावर ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनी अनधिकृत बांधकामाच्या कारवाईवर टाळाटाळ केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
उरुळी कांचन येथील मशिदीचे काम थांबवावे
By admin | Published: May 13, 2017 4:28 AM