- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - समाजात दिवसेंदिवस जातीयतेचे विष वेगाने पसरत आहे. जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांनी समाज पोखरत चालला आहे. राजकीय व्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी हे प्रश्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेषत: मुस्लिम समाजाबद्दल अन्य धर्मियांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. या जखमांवर फुंकर घालण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे नितांत गरजेचे बनले आहे. मुस्लिम समाजातील सकारात्मकतेचे दर्शन घडवणारे ‘कथा-शतक’ लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.गाव-वस्तीपासून शहरातील गरीबवस्तीपर्यंत भारतीय समाजाच्या चाललेल्या जीवन संघर्षात मुस्लिम समाजही खांद्याला खांदा लावून सहभागी झाला आहे.कोणत्याही समाज व्यवस्थेत काही बिघडत असताना काही सकारात्मकही घडत असते. मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न असले तरी अनेकांच्या जीवनात सकारात्मक घटना घडताना दिसतात. सामाजिक काम, अर्थाजर्नासाठी विधायक प्रयत्न, वंचितांना मदतीचा हात अशा मानवतेचे दर्शन घडवणाºया, परस्पर सहकार्याच्या मुस्लिम समाजातील प्रेरणादायी घटना समाजापुढे येणे गरजेचे आहे.या समाजाचे जीवन समग्रतेने जाणून घेता यावे, त्यांना भारतीय अशा सर्वसमावेशक नजरेतून पाहिले जावे, आणि सकारात्मक ऊर्जेचे दर्शन घडावे यासाठी ‘कथा-शतक’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.मुस्लिम समाजातील शंभर सकारात्मक कथा पुढील दोन वर्षांत समाजापुढे आणण्याचा अनोखा आणि विधायक उपक्रम हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटने हाती घेतला आहे.या माध्यमातून मुस्लिम बांधवांमधील सकारात्मकतेचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी अध्यक्षा ईला दलवाई यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचेसचिव राजेंद्र बहाळकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून, सर्व पदाधिकाºयांच्या सहकार्याने या प्रकल्पाला मूर्त स्वरुप देण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे....विनाकारण अढी निर्माण होतेय1 ईला दलवाई म्हणाल्या, ‘मुस्लिम समाज हा देशात पसरलेल्या आणि पसरवल्या जाणाºया गैरसमजांना आणि चुकीच्या माहितीला नेहमीच बळी पडला आहे. त्यामुळे उर्वरित समाजात मुस्लिम समाजाचे एकांगी चित्रच उमटत आहे. त्यामुळे या समाजाबद्दल विनाकारण अढी निर्माण झाली आहे.2 कथा, कादंबºया, चित्रपट आणि अन्य माध्यमातून, काही अपवाद वगळता मुस्लिम समाजाबद्दल नकारात्मक चित्र मांडले जाते. वास्तविक अन्य समाजाची सुख-दु:खे आणि मुस्लिम समाजाची सुख-दु:खे, अडीअडचणी, जीवनसंघर्ष वेगळे नाहीत. मुस्लिम समाजातही मोठ्या प्रमाणात कष्टकरी, कारागीर, मध्यम आणि उच्च वर्ग आहे. त्यांनानी आपल्या रोजीरोटीसाठी, शिक्षणासाठी, स्थिर जीवनासाठी, अभ्युदयासाठी संघर्ष करत आहे. ‘कथा-शतक’ हा त्यांच्या सकारात्मकतेचा आरसा बनणार आहे.’‘कथा-शतक’मधून महाराष्ट्र भरातील मुस्लिम समाजाची अभिव्यक्ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध व्यक्ती, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. ईला दलवाई, विनोद शिरसाठ यांच्यासह संपादक मंडळ तयार करुन कथा शब्दबद्ध केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी साधारपणे दोन वर्षांचा कालावधी लागेल.- राजेंद्र बहाळकर, सचिव,हमीद दलवाई इस्लामिकरिसर्च इन्स्टिट्यूट
‘कथा-शतक’ येणार भेटीला, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 3:50 AM