पुणे : लहान मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये अडकल्याने त्यांचे वाचन कमी झाल्याची ओरड होते. परंतु, मुलांना जर वाचनाची आवड लावली, तर तेदेखील वाचनसंस्कृतीसाठी पुढाकार घेऊन त्यात रमू शकतात. त्यासाठी ठिकठिकाणी वाचनकट्टे होणे आवश्यक आहे. असा उपक्रम सिंहगड रस्त्यावरील काही मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, वाचनसंस्कृती वाढण्यास मदत मिळत आहे.
सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या आणि वाचनाची आवड असणाºया मनस्विनी अभिजित पेंढारकर हिने ज्युनिअर वाचनकट्टा या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. ती पालकांचे वाचन कट्टे ऐकून होती. त्यामुळे तिच्या मनात मुलांचाही वाचनकट्टा का असू नये, असा विचार आला आणि तिने ही गोष्ट मित्र-मैत्रिणींना सांगितली. सुरुवातीला कट्ट्याचा मूळ उद्देश वाचन हा तर होताच, पण त्याबरोबर खेळणे, भेटणे, धमाल आणि गप्पा याच्याकडेही डोळा होता. नंतर ते आकर्षणही मागे पडले आणि मुले दरवेळी वेगळा लेखक, वेगळा विषय शोधून वाचायला लागली. अनिल अवचटांच्या छोट्या, मनाचा वेध घेणाºया अनुभवांच्या वाचनापासून सुरू झालेला वाचन कट्ट्याचा हा प्रवास अर्थातच, पु. ल. हे महत्त्वाचं स्टेशन पार करून आता पुढच्या भेटीच्या वेळी गूढकथांपर्यंत विस्तारत गेला आहे.
वाचनाच्या या अनोख्या धमाल पार्टीत मुलंही आनंदाने रंगूनजातात आणि ही पार्टी पुरेपूर एन्जॉय करतात.ज्युनिअर वाचन कट्ट्याचे स्वरूपकट्ट्यावर एखादा लेखक/लेखिका किंवा विषय ठरवले जातात आणि त्याचे वाचन मुलांनी महिनाभर घरी करायचे असते.मुले घरी जे काही वाचतील त्यापैैकी स्वत:ला आवडलेले, इतरांनी आवर्जून वाचावे असे वाटणाºया साहित्याचे वाचन मुलांनी पुढील कट्ट्याच्या वेळी करायचे असते.काही लेखकांचे साहित्य इतके आहे की त्यासाठी मुलांना एक महिना कमी पडतो. मग सलग २ ते ३ कट्ट्यांना एकाच लेखकांचे वाचनही होते.वाचनकट्टा कधी कोणा सभासदाच्या घरी, बागेतकिंवा सर्वांच्या सोयीच्या ठिकाणी होतो.या महिन्यातील कट्टाकविता हा विषय या महिन्यातील वाचनकट्ट्याचा आहे. स्वत:ला भावलेल्या, आवडलेल्याआणि स्वरचित कवितासुद्धा चालतील.दिनांक : रविवार, दि. ७ आॅक्टोबर २0१८, वयोगट : ५वी पासून पुढे, वेळ : सकाळी ९, स्थळ : राधिका सोसायटी, सरिता वैभवजवळ, सिंहगड रोड.