महावितरण कंपनीने किरकोळ देखभाल दुरुस्ती करण्यासाठी काही खासगी एजन्सींची नियुक्ती केलेली असून त्यांच्याकडे दुरुस्ती व देखभालीची कामे दिली आहेत. मात्र, ही मंडळी केवळ कागदावरच देखभाल दुरूस्ती केल्याचा अहवाल सादर करीत असल्याची माहिती आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन खांबांमधील वीज प्रवाह वाहकतारा ह्या खाली लोंबकळत असल्याने येथेही दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे.
काही ग्राहकांचे मीटर नादुरुस्त होऊन त्यांना अवास्तव बिले येण्याचे प्रकार वाढले असतानाही महावितरण कंपनी या ग्राहकांना वीज मीटर बदलून देण्यास असमर्थता दर्शविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असे ग्राहक महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असूनसुद्धा त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याचे काम महावितरणकडून होत नाही अशी तक्रारही काही ग्राहकांनी केली आहे.
उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर रोडलगत डाळिंब रोडवर असलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर जवळचा फ्यूजबॉक्स सताड उघडा असून यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.