आळंदी : येथील केळगांव ग्रामपंचायत (ता.खेड) ने आळंदी केळगांव रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई करीत ग्रामपंचायतीने कचरा टाकणा-यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाईचा इशारा फलक लावले.मात्र अद्याप पर्यंत एकही दंडात्मक कारवाई केली नसल्याची बाब उघड झाली आहे.यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याचे प्रकारात वाढ झाल्याने
सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात असताना आळंदी लगत केळगाव ग्रामपंचायतने देखील याची दखल घेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई केली. या साठी जनजागृती व्हावी म्हणून लक्षवेधी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला. ५०० रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यातून स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र जाहिरात फलक लावल्या पासून आत्तापर्यंत एक ही दंडात्मक कारवाई केली नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे जाहिरात फलक केवळ नावा पुरता लावला असून कचरा फेकण्याचे प्रकारात वाढ झाली. यामुळे सदर जाहिरात फलकाचे परिसरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य पसरले आहे. ये-जा करताना भाविक, ग्रामस्थांचे लक्ष या फलकासह कच-याचे ढिगा-याकडे वेधले जाते. मात्र नागरिकांना रुमाल नाकावर ठेवून या परिसरातून ये- जा करावी लागत आहे. कच-याचे साम्राज्य दूर करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.केळगाव आळंदीचे बाह्यवळण मार्गावरील कचरा कुंडीचे परिसरातील कचरा टाकणा-या नागरिकांतुन जनजागृती करण्यास ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे भाविक सांगतात.ग्रामपंचायतीने कच-याचे साम्राज्य दूर करून दंडात्मक कारवाई केल्यास बोलके दृश्य कायम राहणार नाही. या ठिकाणी केवळ जाहिरात फलक लावण्यात आला. मात्र कारवाई नसल्याने कचरा टाकणा-यांत धाक राहिला नाही. यामुळे कचरा फेकून जाणा-यांची संख्या वाढल्याने ढिगारे वाढले आहे. परिसरात कचºयाचे साम्राज्य साचल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे.
या संदर्भात आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर म्हणाले, आळंदी लगतचा कचरा वाहनांतून आणून आळंदीत टाकला जात आहे. यापुढील काळात संबंधितांवर कारवाई करण्यास सोयीचे व्हावे म्हणून अशा ठिकाणांवर सी.सी.टी. व्ही लावण्यात आले आहेत. केळगाव व च-होली ग्रामपंचायत ग्रामसेवकांना पत्र देऊन लक्ष वेधण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.केळगाव ग्रामपंचायतच्या वतीने हद्दीतून घंटागाडीच्या माध्यमातून कचरा जमा केला जातो. हा कचरा कचरा डेपोत टाकला जात असून आळंदी लगत चा कचरा यात्रा व परिसरातील धर्मशाळा, मंगल कार्यालये यांच्यामुळे वाढला आहे. ग्रामपंचायतीने सदर ठिकाणी जनजागृती साठी फलक लावला आहे. मात्र, हा कचरा आळंदी नगरपरिषद हद्दीतील असल्याचा खुलासा केला आहे. या पुढील काळात ग्रामसभेत निर्णय घेऊन कारवाई केली जाणार आहे. आळंदी नगरपरिषदेला या बाबत पत्र देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या संदर्भात पाणी पुरवठा समिती अध्यक्ष संतोष गुंड म्हणाले, आळंदी लगतच्या कुबेर गंगा ओढ्या लगत तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून मोठी ड्रेनेज लाइन तसेच ठिकठिकाणी ओढ्यावर पूल बांधण्याचा ग्रामपंचायत जिल्हा प्रशासनांकडे प्रस्ताव देणार आहे.