योगेश भोसले, नयन महाले, अभिषेक गायकवाड, कुलदीप यादव या समविचारी मित्रांनी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केले. अलीकडच्या काळात वयोमानामुळे या वृद्ध जोडप्याला घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यातच व्यसनी मुलांनीही जबाबदारी घेण्याचे टाळले. असहाय्य, बेघर आणि कफल्लक झालेल्या या जोडप्याची ही दयनीय अवस्था झाल्याचे समजल्यावर योगेश भोसले आणि त्याच्या समविचारी मित्रांनी भाड्याने दोन खोल्याचे घर यवत रेल्वेस्टेशनजवळ करून दिले.
बेघर होऊन भीक मागण्याची वेळ आलेल्या या जोडप्याची केवळ राहण्याची व्यवस्था करून न थांबता त्यांच्या अन्नपाण्याचीही तजबीज त्यांनी केली...आणि आता आनंदाने हे वृद्ध जोडपे जीवन कंठू लागलं. अलीकडे लॉकडाऊनच्या काळात आजी घरात पाय घसरून पडल्या. या काळात अनेक डॉक्टर घरी जाऊन उपचार करण्यास धजावत असताना, यवतच्या डॉ. अमित थोरात यांनी स्वतः घरी जाऊन विनामूल्य त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्याच हॉस्पिटलशेजारील मेडिकल दुकानदार सचिन हेंद्रे यांनी औषधाचे पैसेही घेतले नाही. या दोघांचेही या वृद्ध जोडप्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. काही दिवसांनंतर आजीचे निधन झाले. आता आजोबांना सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर पडेल. या भीतीतून मुलांनी अंत्यविधीस येण्याचेही टाळले.
या परिसरातील लोक एकाकी पडलेल्या आजोबांना मायेची सावली देऊ लागली. जेवणाखाण्याची सोय आता त्यांची झाली होती. काही दिवसांपासून एकाकीपणाने असहाय झालेल्या आजोबांनी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आवटी या गावी असलेल्या मुलीकडे कायमचे जाण्याची इच्छा भोसले यांच्याकडे व्यक्त केली. आजोबांची परिस्थिती पाहून घरमालकाने उदार मनाने थकलेले घरभाडे घेण्याचे विनम्रपणे नाकारले. उरुळीकांचन येथील नर्सरी व्यावसायिक सुरेश भोसले यांनी स्वतःचा टेम्पो विनामोबदला दिला. भोसले यांनी स्वतः ड्रायव्हिंग करून त्यांच्या मित्रांच्या सहकाऱ्याने आजोबांना त्यांच्या मुलीकडे सुखरूप पोहोचवले. ग्रामस्थांना सारी वस्तुस्थिती आजोबांकडून कळली. हे तरुणांचे परतताना पाहून आजोबा अतिशय भावुक झाले होते. अश्रूंना वाट मोकळी करून त्यांनी मिठी मारली.
फोटोओळ १) (दाढी वाढवलेली असलेले)
योगेश भोसले
२) संतोष कोतवाल