नीरा (ता. पुरंदर) येथे सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून आठवडे बाजार भरवला जात आहे. त्यामुळे नीरा परिसरामध्ये कोरोनाचा धोका वाढतो आहे.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मांडकी, जेऊर, पिंपरे, थोपटेवाडी, कर्नलवाडी, गुळुंचे, राख या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच गावातील लोक मोठ्यासंख्येन नीरा बाजारपेठेत विनाकारण गर्दी करतात. त्याचबरोबर नीरा शहरात सुद्धा कोरोनाचे २० रुग्ण उपचार घेत आहेत. तर नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये अद्याप ८० रुग्ण सक्रिय आहेत. नीरा मध्ये सध्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून कोरोना नियमांची पायमल्ली केली जात आहे. आठवडे बाजार भरवण्यास परवानगी नसताना सुद्धा मागील बुधवारी बाजारकर ठेकेदाराने आठवडे बाजार भरून ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे व लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही, तरी देखील अशी दुकाने सुरू आहेत. आता ही दुकाने दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असतात. व्यापारी कोरोनाबाबतचे कोणतेही नियम पाळत नाहीत आणि आजूबाजूच्या गावातील लोक नीरेमध्ये वावरत असतात, गर्दी करीत असतात. त्यामुळे नीरा शहरात कोरोना उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यात तालुक्यासह नीरेती कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. छोट्या व्यावसायिकांना दोन वेळच्या जेवणाची चणचण भासू लागली. कर्जाचे हप्ते, वीजबिल, दुकानभाडे, शालेय फी इत्यादी थकल्याने आर्थिक देणी मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याने व्यावसायिकांनी निर्धारित वेळेत कोरोनाचे सर्व नियम तंतोतंत पाळून व्यावसाय करण्याची परवागी मागतली. काही दुकानदारांनी सावधानता बाळगत व्यवसाय सुरू केले ते गैर आहे. पंचायतीने बाजार बंदची दवंडी देऊनही बाजार भरवल्याबद्दल ठेकेदाराला जाब विचारला आहे. यापुढे बाजार भरल्यास ठेकेदारावर कडक कारवाई करू. नियम न पाळल्यास पोलीस व ग्रामपंचायतीचे कर्मचारी दंडात्मक कारवाई करतील."
राजेश काकडे - उपसरपंच, नीरा ग्रामपंचायत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून आठवडे बाजार भरवला जात आहे. त्याचबरोबर परवानगी नसली तरी राजरोसपणे विविध व्यवसाय रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे नीरा परिसरामध्ये कोरोनाचा धोका वाढतो आहे. ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यायला हवं.
ग्रामपंचायत सदस्य व विरोधी पक्षाचे गटनेते ,अनिल चव्हाण